लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती निमित्त प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अतांत्रिक विभागाच्या वतीने आयोजित जिल्हा क्रिडास्तरीय क्रिडा स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी कसगावडे बोलत होते. यावेळी जिल्हा क्रिडा अधिकारी सौ.भाग्यश्री बिले,राज्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरंगे,तालुका क्रिडा अधिकारी प्रकाश मोहारे, सह सचिव भारत घोगरे,विद्यापीठाचे सिनेट सदस्य आणि अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,संस्थेचे क्रिडा संचालक डाॅ.प्रमोद विखे,डाॅ.उत्तम अनाप,प्रा, सुनिल गागरे,सुनिल आहेर प्रा. बाळासाहेब विखे,आदीसह क्रिडा शिक्षक उपस्थित होते.
प्रवरेचे क्रिडा क्षेञातही महत्वपुर्ण योगदान- उपसंचालक महादेव कसगावडे
लोणी दि.१०( प्रतिनिधी):-
ग्रामीण भागात ही चांगले खेळाडू निर्माण होऊशकतात हेच प्रवरेने सिद्ध केले आहे. शहरी भागाप्रमाणे सर्व सुविधा प्रवरेत सुरू करून पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण शिक्षणांचे मॉडेल उभे करतांना शेतकरी आणि सामान्य जनतेच्या मुलांना मोठा आधार दिला असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे क्रिडा आणि युवा सेवा विभागाचे उपसंचालक महादेव कसगावडे यांनी केले.
आपल्या मार्गदर्शनात कसगावडे म्हणाले पुणे विद्यापीठात प्रवरा ही शैक्षणिक गुणवत्तेबरोबरचं क्रिडा क्षेञातही अव्वल स्थानावर आहे. शिक्षण बरोबरचं क्रिडा क्षेत्रातून प्रवरेचे विद्यार्थी देशपातळीवर पोहचले असे सांगून पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील, पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांचा आदर्श घेऊन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील काम करत असल्यामुळे येथील शिक्षण संस्था कायमचं विविध उपक्रमातून पुणे विद्यापीठासाठी रोल मॉडेल ठरत आहे.विविध सुविधा मुळेचं क्रिडा क्षेत्रात प्रवरेने आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे सांगितले.यावेळी भारत घोगरे यांनी पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांचा आदर्श समोर ठेऊन विद्यार्थ्यानी पुढे जावे असे सांगितले.यावेळी विविध क्रिडा प्रकारांत यश संपादन केलेल्या खेळाडूचा गौरव मान्यवरांनी केला.
प्रारंभी डॉ प्रदिप दिघे यांनी प्रास्ताविक केले.अहवाल वाचन डाॅ. प्रमोद विखे यांनी तर आभार सुनिल गागरे मानले.



