श्रीगोंदा( जनता आवाज वृत्तसेवा ):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त ते श्रीगोंदा फॅक्टरी येथे आले होते अनुराधा राजेंद्र नागवडे यांनी आयोजीत केलेल्या कार्यक्रमामध्ये माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांशी संवाद साधला तसेच विविध योजनांची माहिती देत योजनांचा जणू पाऊसच पाडला. येत्या १९ ऑगस्टला रक्षाबंधन ला महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करणार.
माझी लाडकी बहीण ही योजना कशी अडचणीत येईल अशी टीका विरोधक करतात. गोरगरीब महिलांचं चांगले होत आहे तर विरोधकांच्या पोटात दुखायला लागले. परंतु जोपर्यंत सरकार मध्ये आहे तोपर्यंत योजना चालू ठेवणार हा अजित दादाचा वादा आहे. सरकारमध्ये आम्ही लोकांची कामे करण्यासाठी आलो आहोत गरिबी आणि विकास यांची सांगड घालून ही योजना सुरू केली आहे
आर्थिक अडचणींमुळे महिला स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात ज्या देशांनी महिलांना आर्थिक स्थिरता दिली ते देश पुढे गेले आम्ही शिव शाहू फुले यांच्या विचारांनी पुढे जाणार आहोत. २.५ लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या कुठल्याही जाती धर्मातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. गरीब महिलांसाठी वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणार, आठ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या मुलींना शिक्षणासाठी शंभर टक्के फी सरकार माफ करणार आहे,यासाठी २.५ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. एक मुलगी शिकली तर कुटुंबाचा सर्वांगीण विकास होतो.
महिलांसाठी पिंक इ रिक्षा घेण्यासाठी ७० टक्के अनुदान सरकार देणार तसेच लाडक्या भावांनाही सौर ऊर्जा पंप देणार यासाठी १४ हजार कोटींची सरकार जबाबदारी घेणार. त्यासाठी वेगवेगळ्या भागांमध्ये जागा निवडून सोलर प्लांट करणार आहोत तसेच वीज निर्मितीसाठी वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करणार. दुधाला पाच रुपये प्रति लिटर अनुदान केले आहे, कांदा निर्यात बंदी यापुढे करायची नाही शेतकरी आमची जात आहे असेही ते म्हणाले.
यावेळी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, अनुराधाताई नागवडे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांशी हितगुज केले.
जिकडे तिकडे गुलाबी रंगाचे फलक लागल्याने आगामी काळातील निवडणुकांमध्ये अजित पवार वेगळा निर्णय घेतात की काय असा चर्चेचा विषय कार्यक्रम स्थळी रंगला..!
बेरोजगारी कमी करण्याचा रस्ता आम्ही निवडला आहे सर्वांकरिता योजना आणल्या आहेत सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी करेल जे बोलेल ते करेल हे नागवडे बापूंच्या पुतळ्यासमोर सांगतो. महिलांशी संवाद साधताना महिलांनी विचारले ही योजना फक्त निवडणुकीपूर्तीच आहे का त्यावर त्यांनी सांगितले योजना कायमस्वरूपी चालवायची असेल तर आम्हाला सत्तेत बसवा.