प्रा.अमोल सावंत यांनी “कॉनसिक्वेन्स ऑफ सेलेक्टेड बाँटनिकल ऑन ऍफीड अँड सायटोलॉजिकल इफेक्ट ऑफ सिन्थेटिक इंसेक्टिसाइड ऑन ओनियन रूट टीप सेल” या विषयावर संशोधन करून भगवंत विद्यापीठ, अजमेर येथे शोध निबंध सादर केला होता. विद्यापीठाच्या समितीने सदर शोधनिबंध मान्य करत प्रा.सावंत यांस पीएच.डी पदवी प्रदान केली. प्रा.अमोल सावंत यांना जैवतंत्रज्ञान विभागातील डॉ.भनवर लाल जाट यांचे प्रमुख मार्गदर्शक तसेच पद्यश्री डाॅ.विखे पाटील महाविद्यालयाचे वनस्पतीविद्या विभाग प्रमुख डॉ.अनिल वाबळे यांचे मार्गदर्शक म्हणून विशेष योगदान लाभले. सध्या प्रा.सावंत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील वनस्पती शास्त्र या विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.प्रा.अमोल सावंत यांनी आपले पदवी शिक्षण कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे तर पदव्युत्तर शिक्षण इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी, संभाजीनगर येथे पूर्ण केले.
प्रवरेच्या प्रा.अमोल सावंत यांना पीएचडी प्रदान
लोणी दि.१० (प्रतिनिधी):-लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथील प्रा.अमोल रमेश सावंत यांना भगवंत विद्यापीठ, अजमेर येथून जैवतंत्रज्ञान या विषयात पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
प्रा.सावंत यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खा.डॉ.सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव श्री.भारत घोगरे, कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयाच्या संचालिका डॉ.शुभांगी साळोखे, प्राचार्य. डॉ.विशाल केदारी, डॉ.किरण गोंटे तसेच इतर शिक्षक वृंदानी अभिनंदन केले.



