5.6 C
New York
Saturday, March 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

शेतकरी शेती प्रश्नावर संघटित झाल्याशिवाय लूटीची व्यवस्था ठिकाणावर येणार नाही—जिल्हाध्यक्ष अनिल औताडे .

शिरसगाव ( जनता आवाज वृत्तसेवा):-राज्य शासनाने दूध दरासंदर्भात पाच जुलै 2024 रोजी शासन निर्णय करून ३.५फॅट्स व ८.५ एस एन एफ च्या दुधास १ जुलै २०२४ पासून 30 रुपये प्रति लिटर दर जाहीर केला आहे. परंतु याबाबत खाजगी दूध संघाकडून असमर्थाचा दर्शविली जात असल्याने शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांना २५/०७ /२०२४ रोजी सकाळी ११ वा .घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गोंडेगाव येथील जनजागृती सभेत शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे बोलत होते.

ते पुढे म्हणाले की लोकशाही स्वीकारलेल्या देशात व राज्यात निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच कायदेशीर मार्गाचा अवलंब होत नाही ही बाब गैर आहे. राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणी अहमदनगर जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांच्याकडून प्रभावीपणे होत नाही. १/६/ २०२४  ते १०/६/ २०२४  या दहा दिवसाचे पेमेंट दूध संघांनी जुन्याच दराने काढल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार जिल्हा दुग्धविकास अधिकारी यांना असूनहीं ते संबंधित संघांवर अथवा दूध संकलन केंद्रांवर कारवाई का करत नाही असाही सवाल निर्माण होत आहे.

जानेवारी ते मार्च या दोन महिन्यातील प्रति लिटर पाच रुपये राज्य शासनाचेअनुदानही शेतकऱ्यांना मिळालेले नाही. आज रोजी जिल्ह्यात कुठल्याही दूध संघांवर व दूध संकलन केंद्रांवर अन्न व भेसळ प्रतिबंधक अधिकारी ,वजन मापे निरीक्षक अधिकारी व जिल्हा दुग्धविकास अधिकारी हे कुठल्याही तपासण्या व कारवाया करत नाही. बहुतांश दूध संकलन केंद्रावरील वजन काटे व फॅट्स मशीन प्रामाणिक आहे किंवा नाही याचा कुठलाही शासन स्तरावर विचार होत नाही. दूध संकलन करणाऱ्या दूध संकलकांना दूध संकलनाचे प्रमाणपत्र आहे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे एकूणच दूध व्यवसायामध्ये दूध संकलन केंद्र पासून ते दूध संघांपर्यंत सर्वच कारभार अनागोंदी व बोगस असल्याचे दिसून येत आहे . राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जानेवारी २०२४ मध्ये दूध भेसळी बाबत मोठे वक्तव्य करू नये अधिकाऱ्यांकडून याबाबतच्या कारवाया का झाल्या नाही असाही प्रश्न निर्माण होत राज्यात 30 टक्के भेसळयुक्त दूध असल्याचे समोर येऊ नये सदर दूध भेसळ थांबविण्यात शासन कमी पडले किंवा अप्रत्यक्ष शासनाकडून यास समर्थन आहे काय असाही प्रश्न निर्माण होत आहे.या भ्रष्ट व बेकायदेशीर व्यवस्थेचा शेतकरी बळी ठरत आहे.

त्यामुळे या गंभीर बाबींचा जाब विचारण्यासाठी शेतकरी संघटना व दूध उत्पादक शेतकरी संबंधित अधिकाऱ्यांना घेराव घालून ठिय्या आंदोलन करणार आहे. तरी या आंदोलनास जास्तीत जास्त संख्येने दूध उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांनी केले. यावेळी शेतकरी संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक सुदामतात्या औताडे शेतकरी संघटनेचे विलासराव कदम संतोष हरगुडे, भाऊलाल फोपसे, अशोक थोरात, विजय भवर, धोंडीराम म्हैस, राजेंद्र कापसे, यशवंत फोपसे, रमेश फोपसे आधी दूध उत्पादक शेतकरी सभेस हजर होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!