सात्रळ, दि. १०: (प्रतिनिधी) लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील रसायनशास्त्र संशोधन समिती व ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागांतर्गत आयोजित संशोधनाच्या परदेशातील संधी या विषयावर डॉ. अस्लम शेख बोलत होते.
डॉ. अस्लम शेख हे महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचे माजी विद्यार्थी असून नुकतीच त्यांची भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) रोपड, पंजाब येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झालेली आहे.
डॉ. अस्लम शेख यांच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था, रोपड पंजाब येथील रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल महाविद्यालयाने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. सदर कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. अमित वाघमारे, संशोधन समिती समन्वयक डॉ. विजय कडनोर, ट्रेनिंग प्लेसमेंट समन्वय प्रा. छाया कार्ले व प्रो. डॉ. शिवाजी पंडित उपस्थित होते
डॉ. अस्लम शेख यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव मा. भारत पा. घोगरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ तसेच स्थानिक सल्लागार समितीने अभिनंदन केले आहे.



