संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- येथील अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या ८० विधार्थ्यांची बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या कंपन्यांमध्ये थेट मुलाखतीद्वारे निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. वेंकटेश यांनी दिली. सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रातील गोदरेज प्रॉपर्टीज, जमीलस्टील, पॅनगल्फ इंडिया, इंडोरा माव्हेंचर, सोभा डेव्हलपर्स, एस.जे.काँट्रॅक्टस, Q-स्पायडर, एंडोव्हन्स, ईमसिटी डेव्हलपर्स यासारख्या कंपन्यांनी महाविद्यालयाला भेटी दिल्या. यातील बहुसंख्य कंपन्या ह्या सिव्हिल इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर क्षेत्रात कार्यरत आहेत.
अमृतवाहिनीतील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने १९८३ साला पासून यशाची उज्वल परंपरा जपली आहे. उत्कृष्ट निकाल,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या मधील प्लेसमेंट, नवनवीन विषयांवर कार्यशाळा, सेमिनार, कॉन्फरन्स या सर्वांच्या माध्यमातून सिव्हिल इंजिनिअरिंग विभागाने कार्यक्षम विधार्थी घडवण्याचे काम केले आहे. सावित्राबाई फुले पुणे विधापीठाच्या अंतर्गतएम.इ. (स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग) आणि पी.एच.डी.संशोधन केंद्रात अनेक विधार्थी शिक्षण घेत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या एमपीएससी आणि सरळ सेवेमधून आतापर्यंत २२६ विधार्थी सार्वजनिक बांधकाम, जलसंपदाविभाग, जीवनप्राधिकरण, नगररचना, नगरपालिका, ज़िल्हापरिषदा, पंचायत समिती या सारख्या विभागात कार्यरत आहेत. सुमारे २३२ विधार्थी यशस्वी उद्योजक म्हणून काम करत आहेत.
या शेक्षणिक वर्षात आत्तापर्यंत १८ बांधकाम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांनी विध्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह घेतले. यातून थेट मुलाखतीद्वारे आत्ता पर्यंत ८० विधार्थ्यांची निवड झाली आहे. विध्यार्थ्यांच्या थेट मुलाखतीसाठी प्लेसमेंट विभागाचे प्रा प्रवीण वाकचौरे, सिव्हिल इंजिनिअरिंग समन्वयक प्रा.एन.क.खैरनार, विभाग प्रमुख डॉ.एस.बी.कांडेकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे माजीमंत्री आमदार बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, विश्वस्त सौ.शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकाडमिक्स डॉ.जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश, रजिस्ट्रार प्रा.व्ही.पी.वाघे, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.एस.बी.कांडेकर आदींनी अभिनंदन केले आहे.