25 C
New York
Monday, September 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

एलसीबीकडून दरमहा 27 कोटी 60 लाखांचे हप्ते वसुली ! नीलेश लंके यांची धक्कादायक माहिती  लंके यांनी जाहिर केले पोलीसांचे रेटकार्ड 

नगर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- नगर पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून दरमहा 27 कोटी 60 लाख रूपयांचे हप्ते वसुल करण्यात येत असल्याची धक्कादायक माहीती खा. नीलेश लंके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी लंके यांनी पोलीस वसुल करीत असलेल्या हप्त्यांचे रेटकार्डच जाहिर केले. 

यावेळी बोलताना खा. लंके म्हणाले, पोलीस दलातील दोन टक्के अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे. समाज भयभीत झालेला आहे. अवैध धंद्यांना कोण पाठीशी घालते ? खुनाचा तपास का लागत नाही ? स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे चुकीच्या कर्मचाऱ्यांची ऑर्डर आपल्या विभागात करून घेतात. सायबर विभागात बदली असलेले कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेत काम करतात. याच विभागाची प्रोत्साहनपर बक्षिसे घेतात. आजच याच विभागाच्या चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याविरोधात लाचलुचपत विभागामार्फत गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही पोलीस प्रशासनास पुरावे हवेत का असा सवाल लंके यांनी यावेळी केला.

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी खा. लंके यांच्या उपोषणास तीन दिवस झाले तरी पोलीस अधिक्षक भेटीसाठी का येत नाहीत असा प्रश्‍न उपस्थित केला. भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्याचे काम वरीष्ठ अधिकारी करत आहेत का ? सकारात्मक चर्चा होत असताना वरीष्ठ अधिकारी मात्र वेगळाचा प्रस्ताव देतात. याचा अर्थ या भ्रष्टाचारास राज्याच्या गृह खात्याचे पाठबळ आहे असा संदेश राज्यात जाईल. या आंदोलनाकडे दुर्लक्ष झाल्यास राज्यपातळीवर हे आंदोलन नेले जाईल असा इशारा फाळके यांनी दिला. आता पोलीस अधिक्षकांशी आम्ही चर्चा करणार नाही. आयुक्त दर्जाच्या अधिका-यांशी चर्चा करू असेही फाळके म्हणाले.

काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस दलास कलंक लावला असून त्यांना वरिष्ठ पातळवरून अधिकारी पाठीशी घालतात हे दुर्देव असल्याचे आ. प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.

खा. लंके यांनी जाहिर केलेले पोलीसांचे रेट कार्ड 

चंंदन तस्करी, रेशनींग 40 लाख

 हिरा गुटखा 68 लाख

विमल गुटखा 60 लाख

आरएमडी गुटखा 25 लाख

नगर शहर कॅफे 50 लाख

 वाळू ट्रॅक्टर 2 कोटी 50 लाख 

वाळू गाडी 4 कोटी 80 लाख

जेसीबी 1 कोटी 40 लाख

 पोकलेन 50 लाख

आयपीएल सट्टा 50 लाख 

वेश्या व्यवसाय हॉटेल 30 लाख 

इतर अवैध व्यवसाय 55 लाख 

मटका 7 कोटी 55 लाख 

बिंगो 1 कोटी 40 लाख 

मावा 3 कोटी 30 लाख 

दारू हॉटेल 75 लाख

 डिझेल, पेट्रोल तस्करी 12 लाख 50 हजार

ट्रक रिक्षा 10 लाख

जुगार 75 लाख

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!