श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- शहर पोलिसात (दि 17) 2024 रोजी फिर्यादी सार्थक राजेश खटोड धंदा ट्रॅक्टर शोरूम (रा बेलापूर ता श्रीरामपूर ) यांनी दिलेल्या दि.8) 2023 रोजी सायकाळी चार वाजता यातील नामे सुमारास सोमनाथ रामदास खोसे (रा. बेल्हेकरवाडी ता.नेवासा ) तौफिक शफीक शेख( रा. सोनई ता.नेवासा ) यांनी बेलापूर येथील पढेगाव ररत्यावरील एस्कॉर्ट शोरुमवर येथे येवून एस्कॉर्ट पावरस्ट्रक 439 पावरहाऊस 45 HP या मॉडेलची मागणी केली असता फिर्यादी यांचे शोरुमला आरोपीनी मजकूर यांनी मागणी केलेला मॉडेलचा ट्रॅक्टर हा आरोपीत मजकूर यांना राहाता साई सांवता ट्रॅक्टर शोरुममधून त्यांना एस्कार्ट पावरस्टक 4.39 पावरहाऊस 45 HP चेसी.ने.1053602568C1. इंजिन नं -E3679072 असलेला ट्रॅक्टर मॉडेल उपलब्ध करून दिला.त्यावेळी आरोपीत मजकुर आरोपी यांचे नावे फिर्यादी यांचे शोरुमला आरोपीत मजकूर यांनी संगणमताने 70,000 रु रोख भरले.व त्यावेळी आरोपी यांनी फिर्यादीस आम्ही उद्याच कागदपत्रे बॅकेत जमा करून बॅक श्रीरामपूर शाखेतून कर्ज मंजूर करून तुमचे बाकीचे 6,10,000/- रु देवून टाकतो असे बोलून फिर्यादीचा विश्वास संपादन केला.आणि ट्रॅक्टर ताब्यात घेतला होता.
त्यानंतर कुठल्याही बॅकेचे लोन न करता आजपावेतो फिर्यादीची एकुण 6,10,000/- रु रक्कम दिली नाहीत.आणि संगनमताने विश्वासघात करुन फिर्यादीची एकुण 6.10,000/- रु रकमेची फसवणूक केली आहे. खटोड यांच्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर शहर पोलीसात गु.र.नं 704/2024 भा.द.वि.कलम 406,420 प्रमाणे दि. 17/07/2024 रोजी 17/24 वा.गुन्हा दाखल करण्यात आलेला आहेत.सदरचा गुन्हा दाखल होताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख पोलिस हेड कॉ बाळासाहेब कोळपे यांना वरिष्ठ पातळी वरून तपासाचे आदेश दिल्यानंतर आरोपी तौफिक शफीक शेख रा.सोनई ता.नेवासा हा पारनेर पोलीस ठाण्यात गु.र.न 111/2024 भा.द.वि कलम 381 या गुन्ह्यात अटकेत असताना त्यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडील वरील गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडे गुन्ह्यातील पाहिजे ते असलेला आरोपी सोमनाथ रामदास खोसे यांचे ठिकाणा बाबत माहिती घेवून आरोपीचा यांचा शोध घेवून त्यास नमुद गुन्ह्यात (दि.21) 2024 रोजी त्यास गुन्ह्यात अटक करून आरोपी यांची मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रीरामपूर कोर्टाकडून वेळोवेळी पो.क रिमांड घेवून आरोपीचा सखोल चौकशीअंती गुन्ह्याचे अनुषाने त्यांचेकडे चौकशी केली असता बारकाईने, कौशल्यपूर्ण रितीने विश्वासात घेवून तपासाकरिता आरोपी यांनी गुन्ह्यातील ट्रॅक्टर हा येवला जि.नाशिक येथे एका शेतकऱ्याला विकला अशी कबुली दिल्याने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोहेको बाळासाहेब कोळपे पोलिस संपत बडे यांना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पुढील तपासाचे आदेश दिल्यामुळे त्यांनी येवला जि.नाशिक येथे जावून येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेवून ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहेत. पोलिसांनी फसवणूक करून नेलेला ट्रॅक्टर हा जप्त करुन तात्काळ गुन्हा उघडकीसआणला.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधिक्षक श्रीरामपूर वैभव कलुबर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शहर पोलीस ठाण्याचे नितीन देशमुख पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड सहाय्यक फौजदार सुधीर हापसे, पोहेकॉ बाळासाहेब कोळपे, पो हेड कॉ संपत बडे, पोलीस भारत तमनर ज्ञानेश्वर वाघमोडे, नंदकिशोर लोखंडे,अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालयाचे पोलीस नाईक सचिन धनाड यांनी कारवाई केली.अधिक तपास बाळासाहेब कोळपे हे करत आहे.