कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा ):- प्रधानमंत्री पिक विमा योजनेविषयी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडी-अडचणीविषयी कंपनी प्रतिनिधी व कृषी विभाग अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडला. यावेळी कृषी विभागासह कंपनी प्रतिनिधींनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात मका पीक शेती शाळा वर्ग उत्साहात पार पडला. यावेळी मंडळ कृषी अधिकारी व्हि. एस. भाकरे, कृषी पर्यवेक्षक सौ. आडसरे, कृषी सहाय्यक सौ. जाधव यांसह आदी उपस्थित होते.
यावेळी पीएमएफबीवाय व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने समृद्धी प्रकल्प प्रचार प्रसिद्धी कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी सरकारने नाफेड ते शेतकरी योजना सुरू केली, त्याबाबत विविध योजनांची सखोल माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
यावेळी ओरिएंटल इन्शुरन्सचे जनरल मॅनेजर अंजू नायर व रश्मी जोगळेकर यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेविषयी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी याविषयी माहिती दिली. याचबरोबर मार्गदर्शन करताना त्यांनी शेतकऱ्यांनी डायरेक्ट रजिस्ट्रेशन करावे, तर शेतकऱ्यांना कशा पद्धतीने पीक विमा भरायचा त्यात ऑनलाइन भरायचा की, ऑफलाईन भरायचा? याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी सद्यस्थितीला वातावरणात मोठे बदल झालेले आहेत. त्याचा परिणाम म्हणून शेत पिकावरील फवारणीला होत आहे. त्यामुळे फवारणी करताना मोठ्या अडचणी येतात, जसे की सद्यस्थितीला एक तास पाऊस येत, तर एक तासात पाऊस लगेच जातो. यासाठी पिकावर आधुनिक तंत्रज्ञानाने कशी फवारणी करता येईल, याबाबतचे परिसरातील शेतकऱ्यांना कृषी उद्योजक अंकित उंडे यांनी इफको कंपनीद्वारे संचलित ड्रोनद्वारे पीक फवारणीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन कोल्हार कृषक गटाचे अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर रघुनाथ खर्डे यांच्या वस्तीवर करण्यात आला होता. यावेळी कृषी शेतकरी गटाचे सर्व सदस्य तसेच महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.