लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-राज्य शासनाच्या वतीने महिलांसाठी आणि बचत गटांसाठी विविध योजना आहेत. बचत गटातून केवळ बचत हा उद्देश न ठेवता यातून रोजगार निर्मितीवर भर देऊन कोणत्याही व्यवसाय करा त्या व्यवसायासाठी जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यासाठी बाजारपेठही देउ. महायुती सरकारच्या महिला आणि मुलींसाठी विविध योजना आहेत या योजनेचा लाभ घेत महिला सक्षम होत आहेत मुलींना शिक्षणातून सक्षम करा त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान अंतर्गत तालुका अभियान कक्ष पंचायत समिती राहाता यांच्या वतीने लोहगाव येथील विठ्ठल रुक्मिणी ग्राम संघ आणि सिंधुताई महिला बचत गट स्वस्त धान्य दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी विखे पाटील कारखान्याचे संचालक भाऊसाहेब चेचरे, अॅड बाबासाहेब चेचरे, माजी सरपंच स्मिता चेचरे, सरपंच शशिकांत पठारे, उपसरपंच दौलत चेचरे, बाळासाहेब दरंदले, सतीश गिरमे, रावसाहेब चेचरे, सेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चेचरे, प्रसाद गायकवाड, कमल चेचरे, सुरेश चेचरे, शांताराम चेचरे तालुका व्यवस्थापक प्रवीण बारेकर, दीपक घुले, राणी माळवे, जनसेवा फाउंडेशनच्या प्रकल्प संचालिका सौ रुपाली लोंढे आदींसह बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
आपल्या मार्गदर्शनात सौ. विखे पाटील म्हणाल्या, बचत गटाचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेण्याची गरज आहे. बचत गटाच्या माध्यमातून आपला आणि कुटुंबाचा विकास करावा. बचत गटातून केवळ बचत न करता या माध्यमातून व्यवसाय निर्मिती करा व्यवसायाचे प्रशिक्षण आपल्याला जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत आपण उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठही या माध्यमातून मिळणार आहे. जनसेवा फौंडेशनच्या माध्यमातून महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा माजी खा. डॉ. सुजय विखे पाटील आणि रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ धनश्रीताई विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध उपक्रम हे सुरू आहेत या उपक्रमांमध्ये महिलांनी सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. शिर्डी मतदार संघात बचत गटाच्या माध्यमातून आदर्श काम होत आहे. या माध्यमातून प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. मुलींसाठी आणि महिलांसाठी महायुतीच्या विविध योजनेचा लाभ घेतानाच या योजना कुणामुळे मिळाल्या ही माहिती करून घ्या. गटाच्या उत्पादनांना मोठी मागणी आहे. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देत असतानाच आज सुकलेल्या फुलांपासून आकर्षक अशा कलाकृती आणि ग्रीटिंग कार्ड या विषयाचे प्रशिक्षण नुकतच घेण्यात आले आपल्या आवडीच्या व्यवसायातून पुढे जावे अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली
तालुका व्यवस्थापक प्रवीण बारेकर यांनी उमेद च्या विविध उपक्रमाचे आणि शासनाच्या विविध योजनेची माहिती यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विखे पाटील कारखान्याचे संचालक भाऊसाहेब चेचरे यांनी तर आभार स्मिता चेचरे यांनी मांनले.
मुलींसाठी अनेक योजना शासनाने सुरु केल्या आहेत.मुलींना मोफत शिक्षण मिळणार असल्याने त्या अगोदर सक्षम बनवा,स्वता:च्या पायावर उभे करा.मुलींच्या लग्ननाची घाई करु नका असा सल्ला सौ.विखे पाटील यांनी दिला.