नाशिक( जनता आवाज वृत्तसेवा ) :- सध्या राज्यात बरेच मुख्यमंत्री होवू लागलेत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाचा मुख्यमंत्री तयार झाला आहे. पण राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
कांदा निर्यात मूल्य कमी होवून अधिक कांदा निर्यात होण्यासंदर्भात निश्चित निर्णय होईल असा विश्वास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
आपण स्वतःही केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या समवेत बोलणार असल्याचे ना. विखेंनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, पाच लाख मेट्रीक टन कांदा निर्यात करायचा आहे. पण सद्यस्थितीत कांदा मिळत नाही. व्यापाऱ्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेठीस धरले आहे का? असा प्रश्न शेतकऱ्यांकडे किती कांदा उपलब्ध आहे हे पाहण्याची सुध्दा गरज निर्माण झाली आहे. मात्र निर्यात मूल्य कमी होवून कांद्याची निर्यात झाली पाहिजे, याबाबत नक्की निर्णय होईल असे त्यांनी आश्वासित केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शदर पवार यांनी केलेली टिका वैफल्यातून आहे. एका जेष्ठ नेत्यांने आशी टिका करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त करून एकेकाळी विमानातून बॉम्ब स्फोटातील आरोपी कोणी आणले होते यावरच राजकारण करत बसायचे का ? असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.
राज्य सरकारकडे निधीची उपलब्धता आहे. म्हणूनच योजना जाहीर केल्या आहेत. लोकाभिमुख योजनासाठी निधीची चिंता नाही. येणाऱ्या काळात लाभार्थ्याच्या खात्यात पैसे जमा होतील, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारने चर्चा करण्याच्या शरद पवार यांच्या मागणीवर बोलताना विखे पाटील म्हणाले की, चार वेळा मुख्यमंत्री राहिले मराठा आरक्षणासाठी एकही निर्णय केला नाही. लोकांच्या मनात फक्त संभ्रम निर्माण करायाचा आणि आपली पोळी भाजून घेण्याचा काही लोकांचा धंदा राज्याने पाहीला आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. पण मुख्यमंत्री महायुतीचाच होणार आशी टिपणी करून विखे पाटील म्हणाले की, सध्या राज्यात बरेच मुख्यमंत्री होवू लागलेत. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक पक्षाचा मुख्यमंत्री तयार झाला आहे. पण राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी आहे. मुख्यमंत्री महायुतीचाच होणार असे ठणकावून सांगत लोकसभेची परीस्थिती विधानसभेला नसेल असे त्यांनी ठामपणे सांगितले.