संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या, अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी डॉ.सी.व्ही.रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत उत्कृष्ट यश मिळविले आहे.कु.वरद पाचोरे (इयत्ता सातवी) याने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळविला,तर कु.पृथ्वीराज नेहे याने जिल्हास्तरावर तिसरा क्रमांक मिळविला आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी एका विशेष वैज्ञानिक कार्यशाळेत स्थान मिळवून त्यांनी श्रीहरीकोटा,इस्रोच्या दौऱ्यावर जाण्याची सुवर्ण संधी या बालवयात मिळविली आहे.
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल नेहमीच गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी कार्यरत असते. सातत्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे पृथ्वीराज व वरदच्या जिद्द, परिश्रम, चिकाटीमुळे या दोन्ही विद्यार्थ्यांनी इस्रोला भेट देण्याची संधी मिळविली आहे. अमृतवाहिनी संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयू देशमुख, स्कूलच्या संचालिका सौ.अंजली कन्नावार यांनी वरद व पृथ्वीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक करून इस्रोच्या भेटीसाठी व भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.