संस्थेकडून दि. १ मे २०२३ ते १० मे २०२३ या कालावधीत आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरात विविध मैदानी खेळ, मनोरंजनात्मक खेळ, प्रवचन.कीर्तन,कथा सादरीकरण,रायफल शूटिंग, धनुर्विद्या,घोडसवारी,योगा, कराटे व तायक्वांदो,पाॅटरी(मातीच्या वस्तू बनवणे),संगीत,गायन व नृत्य, अग्निविरहित पाककला,बून फायर व गिर्यारोहण,देशी व विदेशी खेळ ,जलतरण, जनरल माहिती, श्लोकपठण,महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती व आपला ऐतिहासिक वारसा,रोबोटिक्स व कोडिंग थ्री डी शो, आकाश दर्शन(आकाशगंगा).अशा विविध उपक्रमांचे आयोजन केलेले आहे.प्रार्थनेने व विविध स्तोत्र पठणाने विद्यार्थ्यांच्या दिनक्रमाची सुरुवात होते. उन्हाळी शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिला जातो.त्यामध्ये सकाळचा नाष्टा,दुपारचे जेवण, सायंकाळचा फलाहार, शेकोटी,रात्रीचे जेवण असे उत्कृष्ट नियोजन केलेले आहे. सहभागी विद्यार्थ्यांना दररोज शीतपेय ही दिले जाते. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी केली जाते.
प्रवरा उन्हाळी बाल संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद
लोणी (प्रतिनिधी):- लोकनेते डॉ.बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुश्मिता विखे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या,उन्हाळी बालसंस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.अशी माहिती प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या रोजमीन बेलिम यांनी दिली.
मनोरंजनासाठी सायंकाळी टी.व्ही शो व चित्रपट दाखवला जातो.या विद्यार्थ्यांची सुसज्ज व सर्व सुविधायुक्त वसतीगृहात निवासाची व्यवस्था केलेली आहे.सकाळी सहा वाजता उठल्यानंतर ६:३० ते सायंकाळी ९:३० पर्यंत विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवले जाते. या उन्हाळी शिबिरातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास,त्यांची जडणघडण व वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करून भविष्याची पूर्वतयारी करून घेतली जात आहे.
या उन्हाळी शिबिर नियोजनात संस्थेतील विविध शाखांमधील शिक्षक मार्गदर्शन करत आहे.
या शिबिराच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री.राधाकृष्ण विखे पाटील (महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य) यांनी समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा, सौ.शालिनीताई विखे पाटील यांनी सहभागी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना विशेष कौतुक केले. या उन्हाळी शिबिर नियोजनात प्रवरा सेंट्रल पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. रोझमीन बेलीम यांचे विशेष मार्गदर्शन लाभत आहे.सुरु असलेले उन्हाळी शिबीर यशस्वी करण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर् कर्मचारी अथक परिश्रम घेत आहेत.



