कोपरगांव( जनता आवाज वृत्तसेवा):- संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट (टी अँड पी) विभागाच्या प्रयत्नाने मागील महिन्यात बजाज ऑटो लिमिटेड या पेट्रोल व इलेक्ट्रिक दुचाकी वाहन ऊद्योग निर्मिती कंपनीने शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधिल मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांच्या नोकर भरतीसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन केले होते. कंपनीने या ड्राईव्हचा निकाल जाहिर केला असुन एकुण ३४ अभियंत्यांची प्रॉडक्शन , क्वालिटी कंट्रोल, आर अँड डी, अशा विभागांमध्ये निवड केली आहे. अशा प्रकारे सर्व गरजु विद्यार्थ्यांना नोकरी देण्याचे काम ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग करून दमदार कामगिरी करीत असल्याचे संजीवनी पॉलीटेक्निकच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
निवड झालेल्या अभियंत्यांमध्ये सुमित कुमार, अमित कुमार, अभिजीत रविंद्र आघाडे, विशाल सुनिल शिंदे ,दिपक कुमार यादव, राधेश विजय धापटकर, विवेक कुमार यादव, गुड्डू कुमार, संदिप कुमार, चुन्नु कुमार, कृष्णा अशोक सावंत, अभिषेक देविदास बारवकर, गोकुळ बाळासाहेब पगार, यशराज प्रसाद भगत, अतुल संजय मिसाळ, अश्वजीत सुभाष त्रिभुवन, कृष्णा संतोष चव्हाण, गौरव धर्मराज अहिरराव, सुशील वाल्मिक भाटे, आदित्य वाल्मिक कांबळे, निरज कुमार सिंग, सायली राजेंद्र गांगुर्डे, रोहित उमेश गंगाद्वारे, विक्की कुमार दास, सोनु कुमार यादव, करण दत्तात्रय पायमोडे, वैभव भाऊसाहेब घेगडमल,वैष्णवी संजय पेटकर, वैभव लहानु धांद्रे, श्रेयश राजेंद्र भडांगे, शत्रुधन कुमार, आदित्य भरत पवार, योगेश संतोष भुजाडे व श्रीगणेश अशोक दाभाडे यांचा समावेश आहे.
संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष श्री नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेले अभियंते, त्यांचे पालक, प्राचार्य ए. आर. मिरीकर व ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. आय. के. सय्यद यांचे अभिनंदन केले आहे.