लोणी( जनता आवाज वृत्तसेवा):-फुटबॉल सारखे खेळामध्ये मुलींचा वाढता सहभाग पाहून आनंद होत आहे पंतप्रधान नरेद्रजी मोदी यांच्या खेळो इंडीया धोरणांमुळे अनेक खेळांना महत्व प्राप्त झाले आहे.प्रवरेने ही शिक्षणांसोबत खेळास महत्व दिल्याने आज खेळातही प्रवरा अव्वल स्थानावर आहे, खेळामुळे आरोग्य बौद्धिक क्षमता वाढण्यासाठी मदत होते. अभ्यासाबरोबरच खेळ महत्त्वाचा असून निरोगी राहण्यासाठी तसेच देशाचे आरोग्य निकोप ठेवण्यासाठी स्पर्धेत सहभागी व्हावा असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील सात संघांचा प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणी येथील विभागीय सुब्रतो मुखर्जी कप १७ वर्षे वयोगट मुलींच्या फुटबॉल स्पर्धेच्या सौ .शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.यावेळी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सुष्मिताताई विखे पाटील,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,प्राचार्या भारती कुमकर,क्रिडा अधिकारी विद्या घोरपडे आदीसह खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये पुणे विभागातील पुणे ग्रामीण, पुणे शहर ,पीसीएमसी पुणे, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर ,अहमदनगर ग्रामीण व अहमदनगर शहर या संघा मधून अंतिम फेरीत प्रवरा कन्या विद्या मंदिर च्या संघाने पुणे शहर चा दणदणीत पराभव करून विजय प्राप्त केला . पुणे बालेवाडी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी प्रवरा कन्या विद्या मंदीरचा संघपात्र ठरला. अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी डाॅ.सुष्मिता विखे पाटील उपस्थित राहून विजय संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या चुरशीच्या सामन्यात अक्षरा आघाडी, सायली साठे, संस्कृती गायके, उन्नती भामरे , ज्ञानेश्वरी रिंधे, समृद्धी जंगले , अंजली जाधव , अनुराधा बळी, कार्तिकी आमटे, प्राची बोरसे , रेवती कानतुटे, आरती शेळके , देवयानी जाधव, श्रद्धा विधाटे आकांक्षा आमटे या खेळाडूंचा समावेश होता. खेळाडूंना विद्यालयाच्या क्रीडा शिक्षका फुटबॉल कोच विद्या घोरपडे , साक्षी येडे,कल्पना कडू यांचे मार्गदर्शन लाभले.