4 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

महसूल विभागाकडून महसूल पंधरवड्याचे आयोजन  लोकाभभिमुख योजना लोकापर्यत पोहचविण्यसाठी विविध उपक्रमाचे आयोजन 

नगर( जनता आवाज वृत्तसेवा):-महसूल विभागाकडून दरवर्षी महसूल दिन आणि महसूल सप्ताहाचे आयोजन केले जाते. यात या वर्षी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बदल करून महसूल पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत महसूल पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

या 15 दिवसात महसूल विभागाच्या वतीने विविध उपक्रम राबवून महसूल विभागाचा कारभाराची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवली जाईल आणि लोकांमध्ये महसूल विभागाबद्दल अधिक विश्वास निर्माण होऊन कारभार अधिक लोकाभिमुख होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची नागरिकांना अधिक माहिती मिळावी आणि त्यांची कामे जलद आणि सोपी व्हावी यासाठी महसूल सप्ताह 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट राबविला जाणार आहे. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविले जाणार असून नागरिकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे. 1 ऑगस्टरोजी महसूल दिन साजरा करून महसूल सप्ताहाचा शुभारंभ केला जाईल. या दिवशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जदारांना लागणारी सर्व कागदपत्रे दिली जातील. 2 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, 3 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना , 4 ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय, 5 ऑगस्ट रोजी कृषी मार्गदर्शन कार्यक्रम, 6 ऑगस्ट रोजी शेती, पाऊस आणि दाखले उपक्रम राबविला जाणार आहे.

या उपक्रमात पूर्व मान्सून व मान्सून कालावधीत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पूर यामुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या घरांचे, शेती, फळबागा, जनावरांचे झालेल्या नुकसानीबाबत आढावा घेऊन विविध दाखले वाटप केले जाईल, 7 ऑगस्ट रोजी युवा संवाद उपक्रमाच्या अनुषंगाने शालेय शिक्षण आणि रोजगाराच्या अनुषंगाने विविध दाखल्यांचे वाटप केले जाणार आहे. 8 ऑगस्ट रोजी महसूल जनसंवाद उपक्रमाच्या अंतर्गत महसूल विभागातील विविध प्रकरणे, अपील, सलोखा योजनेतील प्रकरणे, जमिनी विषयक खटले निकाली काढली जातील. 9 ऑगस्ट रोजी महसूल ई प्रणाली उपक्रमातुन ऑनलाईन प्रणालीच्या बाबतीत जनजागृती करून आपले सरकार या सरकारी संकेतस्थळावरील प्राप्त तक्रारींची दखल घेऊन निकाली काढल्या जातील. 10 ऑगस्ट रोजी सैनिक हो तुमच्यासाठी उपक्रमातून सैनिकांच्या बाबतीतील सर्व जमिनीची प्रकरणे, आणि दाखले वाटप केले जातील. 11 ऑगस्ट रोजी आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन करून जनजागृती केली जाईल. 12 ऑगस्ट रोजी एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा राज्याच्या वतीने दिव्यांगासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजना उपक्रमाची माहिती देण्यात येणार आहे.तसेच महसूल विभागाशी संबंधित सर्व प्रकारचे दाखले वाटप केले जातील.

13 ऑगस्ट रोजी महसूल अधिकारी/कर्मचारी यांच्याशी संवाद आणि प्रशिक्षण शिबीर राबविले जाऊन महसूल कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि तक्रारी सोडविल्या जातील. 14 ऑगस्ट रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करून महसूल पंधरवड्यातील माहिती माध्यमांना दिली जाईल. तर 15 ऑगस्ट रोजी संवर्गातील कार्यरत, सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी यांच्याशी संवाद आणि उत्कृष्ट कामे केलेल्या कर्मचारी पुरस्कार वितरण आणि महसूल सप्ताह सांगता समारंभ साजरा केला जाईल.

सदर उपक्रमामुळे शासनबद्दल नागरिकांत विश्वास वाढीस लागून कामकाज अधिक लोकाभिमुख होईल असा विश्वास मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!