लोणी( जनता आवाज वृत्तसेवा ):-राहाता तालुक्यातील दुर्गापूर येथील ह.भ.प दशरथ म्हाळू पुलाटे यांचे वयाच्या ८७ व्यावर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.वारकरी संप्रदायात असलेले कै.दशरथ पुलाटे हे उत्कृष्ठ मृदूगाचार्य होते.दुर्गापूर येथील धार्मिक क्षेञात त्यांचा मोठा सहभाग होता.
पायरेन्सचे माजी अध्यक्ष एम. एम.पुलाटे यांचे ते बंधू तर बबन,ज्ञानदेव आणि यमन पुलाटे यांचे ते वडील होते.त्यांच्या मागे तीन मुले,एक मुलगी सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे त्यांच्या निधनाबद्दल सर्वञ हळहळ व्यक्त होत आहे.