8.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

औद्योगिक वसाहतीच्या पायाभूत सुविधांसाठी १००कोटीचा निधी-ना.विखे पाटील  डिफेन्स क्लस्टरच्या बैठकीत निर्णय 

शिर्डी ( जनता आवाज वृत्तसेवा ):-महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने उभारल्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी एमआयडीसीची निवड झाली असून सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय उद्योगमंत्री मा.उदय सामंत यांनी आज दिला. तसेच या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी 100 कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली. यामुळे आता शिर्डी एमआयडीसीचा विकास जलद गतीने होऊन शिर्डीची देवस्थानाबरोबर आता औद्योगिक नगरी म्हणून नवी ओळख तयार होणार असल्याचा विश्वास अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री मा.श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

डिफेन्स क्लस्टर अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या उद्योगासाठी 1000 कोटींची गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांना सवलतीच्या दरात 200 एकर जमीन देण्याचा निर्णय महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने घेतला आहे. यासंदर्भात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला महसूल तथा पालकमंत्री अहमदनगर राधाकृष्ण विखे पाटील,

माजी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, प्रधान सचिव उद्योग श्री.हर्षदीप कांबळे, औद्योगिक विकास महामंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विपिन शर्मा, विकास आयुक्त डॉ.दीपेंद्रसिंह खुशावत, सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अनिल भंडारी, उद्योग विभागाचे सहसचिव संजय देगावकर, यांच्यासह उद्योजक श्री.कौस्तुभ धवसे, गणेश निबे व इतर औद्योगिक विकास महामंडळाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

शिर्डी एमआयडीसी परिसर हा 502 एकर असून यातील 200 एकर जागा सवलतीच्या दरात देण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. तसेच इतर सवलतीच्या दरांसाठी राज्यमंत्रीमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

सदरचा निर्णय हा शिर्डी, अहमदनगर, नाशिक तसेच आसपासच्या जिल्ह्यासाठी महत्वाचा असून यामुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. शिर्डी क्षेत्र हे देवस्थान म्हणून ओळखले जाते त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात उद्योग येणार असल्याने एक औद्योगिक हब म्हणून उदयास येईल असा विश्वास मंत्री विखे पाटिल यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!