लोणी दि.६( प्रतिनिधी):-पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकीय हितापेक्षा सामाजिक हितास प्राधान्य दिले लोकांच्या हितासाठी सर्वस्व त्यागाची भावना ठेवली नेतृत्व म्हणजे अधिकार गाजवणे नव्हे तर समाजातील सर्व स्तरातील लोकांना बरोबर घेऊन विकास साध्य करणे हे त्यांनी दाखवून दिले समाजातील सर्व स्तरांसाठी त्यागाची भावना ठेवली समाज हितासाठी त्यांनी केलेले कार्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते असे प्रतिपादन पायरेन्स चे संचालक सचिव डॉ.निलेश बनकर यांनी केले
पायरेन्स आयबीएमए मध्ये पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे यांच्या ९१ व्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते . कार्यक्रमास पायरेन्स आय बी एम ए चे संचालक डॉ मोहसिन तांबोळी, डॉ मनोज कुमार लंगोटे, डॉ सतीश बिडकर, प्रा प्रमोद बोऱ्हाडे, प्रा योगेश आहेर, प्रा ऋतुजा कोतकर प्रा. पूजा परजणे, प्रा रेणुका तनपुरे, प्रा धनंजय बोऱ्हाडे, प्रा ऋषिकेश धर्माधिकारी, प्रा. कृष्णा बोरुडे मुख्य वित्त अधिकारी श्री अमोल शिरसाठ कार्यालयीन अधीक्षक श्री रावसाहेब कानडे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आपल्या मनोगतामध्ये डॉ.निलेश बनकर म्हणाले की,पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सहकार ,शिक्षण, उद्योग, कृषी वित्त अशा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवला त्यामुळे त्यांचे नेतृत्व हे बहुआयामी होते विविध क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य समाजास प्रेरक आहे त्यांनी भविष्यकाळासंबंधी दूरदृष्टी ठेवून त्यां मार्गक्रमण केले विविध क्षेत्रातील त्यांचे योगदान नवीन पिढीस वाटचाल करण्यास दिशादर्शक व साहाय्यभूत ठरेल त्यांच्या विचारांची शिदोरी घेऊन युवकांनी मार्गक्रमण करणे गरजेचे आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेंद्र खर्डे यांनी केले.



