20.4 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

चतुर्मासानिमित्त निरंकार उपवासाची पंचकवाणीचा कार्यक्रम कोल्हार येथील तुलसी रांका व गुण रांका यांनी निरंकार उपवास केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार येथे जैन धर्मीयांच्या चतुर्मासानिमित्त चि. तुलसी आनंद रांका व कु. चि. गुण अतुल रांका यांच्या निरंकार आठ उपवासाची पंचकवाणीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.

मंगळवार, दि. 30 जुलै 2024 रोजी अठ्ठाई पचक्खावनी येथे मोठ्या दिमाखात कार्यक्रम संपन्न झाला. जय जयकार जय जयकार तपस्वी का जय जयकार तपस्वी तुलसी व महकी जैसे चंदन, चंदन जैसे कुंदन तपस्वी गुण यांचे अभिनंदन करत संगीतकार राजूभाई शहा (मुंबई) तपस्वी की भक्तीसंध्या कार्यक्रमाने रसिक मंत्रमुग्ध झाले होते. या कार्यक्रमाला उपस्थितीतांनी भरभरून प्रतिसाद दिला.

हा कार्यक्रम परमपूज्य श्री चंदनबालाजी मा. सा. व परमपूज्य पद्मावतीजी मा. सा. आदी ठाणा पाच आणि कैवल्यारत्नाश्री मा. सा. यांच्या आशीर्वाद कृपेने कु. चि. तुलसी रांका व कु. चि. गुण रांका यांच्या निरंकार आठ उपवासाची पंचकवाणीचा कार्यक्रम जैन समाजातील बहुसंख्य बांधवांच्या उपस्थितीतीत जैन स्थानकात पार पडला.

यावेळी समस्त रांका परिवाराच्यावतीने कार्यक्रम आयोजित केला होता. त चंद्रकला कांतीलालजी रांका, ममता रांका, आनंद कांतीलालजी रांका, सोनाली रांका, अतुल कांतीलालजी रांका, नमो रांका, भवी रांका हे कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक होते.

कोल्हार जैन स्थानकाचे संघपती नंदकुमार भटेवार यांनी या कार्यक्रमाला येणाऱ्या भाविकांचे स्वागत केले. त्याचबरोबर भाविकांनी गौतमी प्रसादीचा लाभही घेतला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!