कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका व शहर युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी समवेत युवानेत्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलींद कानवडे, संगमनेर शहर काँग्रेस अध्यक्ष सोमेश्वर दिवटे, जि.प.सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष निखील पापडेजा, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे,,गौरव डोंगरे आदिंसह विविध फ्रटंलचे युवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांना काँग्रेसमध्ये मोठी संधी- आ बाळासाहेब थोरात
संगमनेर (प्रतिनिधी):-सध्या देशात धर्माच्या नावावर होणारे राजकारण हे लोकशाहीला घातक आहे.काँग्रेसचा विचार हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा असून राज्यभरात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. आगामी काळात राज्यात व देशात सत्ता बद्दल निश्चित असून युवकांना काँग्रेस पक्षात मोठी संधी असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ नेते व विधिमंडळ पक्ष नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेसला मोठी वैभवशाली परंपरा असून काँग्रेसचा विचार हा गोरगरिबांच्या विकासाचा शाश्वत विचार आहे. 2004 ते 2014 युपीए सरकारच्या काळात सर्वसामान्यांसाठी राजीव गांधी आरोग्य जीवनदायी योजना, अन्नसुरक्षा कायदा, शिक्षणाचा मूलभूत अधिकार यांसारखे अत्यंत ऐतिहासिक निर्णय होताना देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली होती. मात्र भूलथापा देऊन सत्तेवर आलेले भाजप प्रणित सरकार हे धर्माच्या नावावर राजकारण करत आहे.
विकासाऐवजी धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहेत. देशात सध्या वाढलेली महागाई ,बेरोजगारी हे मूलभूत प्रश्न असून या प्रश्नांवरून इतरत्र लक्ष वळवले जात आहे.राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत चांगले वातावरण आहे. वज्रमुठ सभांसह सर्व निवडणुकांमध्ये जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. जनतेच्या पाठिंब्यातून आगामी काळात देशात व राज्यात नक्कीच सत्ता बदल होणार असून युवकांना काँग्रेस पक्षात मोठी संधी आहे.
संगमनेर तालुक्याचे राजकारण हे सुसंस्कृत असून हा तालुका विकासाचे मॉडेल आहे. कार्यकर्त्यांची मोठी फळी असून सर्वांना समान संधी दिली जात आहे .भेदभाव व जातीपातीला धारा नसल्याने तालुक्याचे शांततामय वातावरण हे इतरांसाठी आदर्शवत आहे .हीच सुसंस्कृत व समृद्ध परंपरा आपल्याला पुढे न्यायची असून यामध्ये युवकांनी अधिकाधिक सक्रिय त्यांनी काम करावे असे आवाहन त्यांनी केले
तर कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका विकासातून वैभव कडे वाटचाल करत आहे .सत्यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. सर्वांनी आपसातील मतभेद दूर करून संघटित होऊन आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले .यावेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
राजश्री शाहू महाराजांचे विचार सदैव प्रेरणादायी
फुले, शाहू ,आंबेडकरांचा पुरोगामी विचार हा आपला विचार असून हा विचार सर्वांना विकासातून पुढे नेणारा आहे .आरक्षणाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजश्री शाहू महाराजांनी समाजात समानता आणण्यासाठी केलेले कार्य पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे सांगून 101 व्या स्मृतिदिनानिमित्त राजश्री शाहू महाराजांना आमदार थोरात यांच्यासह सर्वांनी अभिवादन केले.



