20.4 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्व. सिंधुताई विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माता पालक मेळाव्यातून महिला योजनेसह आरोग्य जनजागृती

कोल्हार( जनता आवाज वृत्तसेवा):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेत आज स्वर्गीय सिंधुताई एकनाथराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने महीलांचे आरोग्य विविध योजना आदी विषयी जनजागृती करण्यात आली अशी माहिती प्राचार्य सुधीर मोरे यांनी दिली.

याप्रसंगी विद्यालयातील माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाच्या वतीने माता पालकांसाठी मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली. माता पालकांनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र अंगणवाडी सेविकांच्या मदतीने पूर्ण केले.त्याचबरोबर विविध माता पालकांचे पोस्ट खात्यातील बचत खाते उघडण्यात आले. कोल्हार बुद्रुक येथील पोस्टमास्टर पठाण आणि त्यांचे सर्व सहकारी विद्यालय मध्ये उपस्थित होते. पठाण आपल्या भाषणामध्ये महिलांना पोस्ट खात्यातील विविध योजनांची माहिती सांगितली तसेच बचतीचे महत्त्व स्पष्ट करून सांगितले.

विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली. उपस्थित माता पालकांना विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि आहार याबाबत मार्गदर्शन केले. अंगणवाडी सेविका सौ वैशालीताई जाधव यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत आवश्यक कागदपत्रांची माहिती दिली आणि योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. पोस्टखाते आणि अंगणवाडी सेविका समाजासाठी घेत असलेल्या मेहनती साठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने सर्वांचा यथोचित सत्कार करण्यात आला. महिलांसाठी विद्यालयाच्या वतीने विविध पाककृती बनविण्याच्या अनुषंगाने तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. विद्यालयाचे पालक सौ सुरेखाताई थेटे यांनी केक बनवण्याची परिपूर्ण माहिती दिली तसेच विविध चायनीज पदार्थांची देखील माहिती देण्यात आली. विद्यालयातील इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य आणि खाऊचे संकलन केले होते, त्याचे वाटप बाभळेश्वर येथील अंध व मूकबधिर विद्यार्थ्यांना जयंतीनिमित्त च्या कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ जया खर्डे यांनी केले तर आभार सौ दिपाली दळे यांनी मानले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सौ योगिता करवा,सौ अनिता पानकर इत्यादींनी मेहनत घेतली.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!