श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील बाबरपूरा चौक, वॉर्ड क्रमांक २ येथे पोलिसांनी छापा टाकून साडेनऊ क्विटल गोमांस जप्त केले असून एका जिवंत गायीची सुटका केली आहे. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या पथकाने – ही कारवाई केली. याप्रकरणी – दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुजाहिद रफिक कुरेशी व हारून अब्दुल नबी कुरेशी असे गुन्हा दाखल झालेल्या पण, आरोपींची नावे आहे. याबाबत स. अधिक माहिती अशी की, काल गुरूचार दि.१ ऑगस्ट रोजी सकाळी पावनेसाठ वाजेच्या सुरेश सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी
शहरातील बाबरपुरा चौक, चॉर्ड नं. २ येथे छापा टाकला असता तेथे जुनैद खलील कुरेशी याच्या घरासमोरच्या वॉलकंपाउंडमधील मोकळ्या जागेत मुजाहिद रफिक कुरेशी, हारून अब्दुल कुरेशी हे दोघे गोवंश जनावरांचे मांस सुरा, कुन्हाडीच्या सहाय्याने तोडत असताना मिळून आले. पोलिसांनी तेथून ९४० किलो गोवंश जनावरांचे मांस, गोवंश जातीची जर्सी गाय तसेच सुरा, कुन्हाड़ी, ठोकळे असा एकूण २ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वाप्रकरणी पोलिस कॉस्टेबल सतीश कटारे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसात मुजाहिद रफिक कुरेशी( वय ३०), हारून अब्दुल नत्थी कुरेशी (वय ४२) दाँधे रा. कुरेशी मोहल्ला, वॉर्ड नं.२, यांच्याविरूद्ध भारतीय न्यायसंहिताचे कलम २७१, २७२, ३(५), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमचे कलम ५. ५ (ब), ९ (अ) यासह प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियमचे कलम ११ (च), ११ (ज) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमें यांच्या सुचनेवरून सपोनि एकनाथ ढोबळे, सहफीजदार राजेंद्र गोडगे, पोलिस कॉस्टेबल रविंद्र चव्हाण, पोलिस नाईक काकासाहेब मोरे आदीनी केली