spot_img
spot_img

नाफेडमार्फत कांद्याची तात्काळ खरेदी करावी राज्यमंत्री भारती पवार यांची मागणी

नाशिक (प्रतिनिधी ):- राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकरी हवा दिल झाला आहे. नासाडी पावसामुळे कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.नाफेडमार्फत तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे.

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी पुढाकार घेतला आहे. नाफेडमार्फत तात्काळ कांद्याची खरेदी करण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याकडे केली आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी भारती पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मागणीनंतर मंत्री पियूष योगल यांनी कांदा खरेदीचं आश्वासन दिलंआहे.

सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली. याचा मोठा आर्थिक राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.कांदा उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. भारतात होणाऱ्या कांदा उत्पादनापैकी जवळपास 30 टक्के कांदा महाराष्ट्रात पिकतो.मागील काही महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचे मत भारती पवार यांनी व्यक्त केले.सद्यस्थितीत कांद्याच्या पडलेल्या किंमती विचारात घेता नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे. भाजप सेना चे नवीन सरकार येऊन दहा महिने उलटले तरीही कोणत्याही प्रकारची अमलबजावणी झालेली नव्हती.
नाफेडमार्फत कांदा खरेदी प्रक्रिया तात्काळ राबवण्यात यावी, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी मंत्री गोयल यांच्याकडे केली आहे. त्यामुळं त्यांच्या या मागणीवर सरकार आता काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात यावा अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केलीय.अवकाळी पावसामुळं कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडला आहे. राज्यमंत्री भारती पवार यांनी केलेली मागणी किती दिवसात पूर्ण होते. याकडे राज्यातील शेतकरी बघत आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी हा हतबल झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकार भारती पवार यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देते.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!