3.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

नित्य नेम प्राणी दुर्लभ संसारी असा संसारी वारकरी… दशरथबुआ तथा दशरथ म्हाळू पुलाटे 

आदिशक्ती दुर्गामाता व सिद्ध योगी पुरुष सद्गुरू आनंदाबाबा यांच्या कृपाप्रसादाने पावन झालेले तसेंच रक्ताच्या नात्याची घट्ट वीण असलेले महाराष्ट्रातील एकमेव गाव म्हणजे दुर्गापूर. स्वातंत्र्य पूर्व काळात शेती हा जगण्याचा आधार. पोटा मोटाच नात जपत गावपण जपणाऱ्या गावांत बालपण घालवलेल्या माणसांची माती आड होत असलेली पिढी. त्यातील एक दशरथ म्हाळू पुलाटे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या आचार विचार व उच्चार याविषयी हे थोडेसे.नावाने हरी असलेल्या हरीबाबाला म्हाळू व नारायण ही दोन मुले. एकाला झाकावं अन दुसऱ्याला दाखाव अस राहणीमान. यातील म्हाळू बाबा व हौशाबाई या स्वप्नांतही दुसऱ्याचे वाईट न चिंतनाऱ्या माता पिताच्या पोटी दशरथचा जन्म झाला.चार मुले मुली आणि पाचवीला पुजलेली गरिबी व पाट पाण्याची थोडी शेती. त्यामुळे हाता तोंडाची गाठ पडायची मारामार.त्यामुळे शेती नोकरी अशी मुलांची विभागणी करून प्रपंचाची घडी बसाविली.मोठा दादा शेतीवर दशरथ कारखान्यात नोकरीला मुरलीधर व कारभारीला शिक्षण देण्याचा प्रगत विचार त्यावेळी जपणारा परिवार.बालपण संपून तरुणपण आले .

कारखान्यात चेन ट्रॅक्टर चालक म्हणून नोकरीची सुरुवात झाली .दाढ येथील तांब्याच्या बबईबाई बरोबर लग्न होऊन संसार सुरु झाला.योगी पुरुष सद् गुरु नारायणगिरीजी महाराज यांच्या परिसरातील व गावातील सप्ताहाने भजनाचा लळा लागला. संत संगतीचे फळ म्हणून आपली नोकरी सांभाळून जेथे भजन तेथे हजर असा नियम सुरु झाला मोडके तोडके गाता येऊ लागले.त्यामुळे लोक त्यांना बुआ म्हणू लागले. दशरथचा दशरथबुआ होऊन गेला.कमी तेथे मी अशी भजनातील त्यांची हजेरी असे .पण नेहमीच्या ट्रॅक्टरच्या मोठया आवाजाने कानांनी काम कमी केले. त्यामुळे भजनात अडचण व्हायची तरीही जिद्द न सोडता गायनाची उणीव भक्तीने भरून काढली. नित्य घरी हरीपाठ सेवा घडू लागली जगाचा निरोप घेतानाही आदल्या दिवशी हरिपाठ करून गेलेले दशरथबुआ म्हणजे नित्य नेम प्राणी दुर्लभ संसारी यातील दुर्लभ संसारी वारकऱ्याचे जीवन जगणं कसे असते याचे हे एक उदाहरण. हे सर्व करत असताना आजच्या सुनेला छळण्याच्या काळात सुनांना मुलींसमान प्रेम देणारे दशरथबुआ यांना जाण्याच्या आधी दोन दिवस त्यांना मुलीसमान सुनांनी प्रेमाने चैतन्यरूपात घातलेली अखेरची आंघोळ हे त्याचे गोड फळ त्यांना याची देही याची डोळा अनुभवण्याचे भाग्य त्यांना लाभले.वृद्धाश्रमात शेवटचा श्वास घ्यायला कारण झालेल्या श्रीमतांच्या सुनांना या दशरथबुवांच्या नात्याने सुना पण प्रेमाने मुली झालेल्या सुना एक आदर्श उदाहरण आहे. दशरथ बुवा यांचा

स्वभाव कडक असला तरी आतून प्रेमळ होता.अभंग आणि किर्तनाची चाल गायनात मोठा रस होता.धार्मिक कार्यात कायम सोबत असत. सदगुरु गंगागिरी महाराज,नारायणगिरी महाराज आणि धोंगडे गुरुजी यांचा सहवास आदर्श त्यांनी जपला. नातवंडावर विशेष प्रेम असणाऱ्या दशरथबुआ यांना घरवे सर्व दादा म्हणत. ते नारळासारखे सुख दुखाचे घाव सोसत जीवनात संघर्ष करत पुढे गेले. त्यांनी अनेक चढउतार बघितले. दोन बहीणी, एक भाऊ,एक सुन, एक पुतण्या गेल्यानतंरचे दु: खही त्यांनी सहन केले.पत्नी बबईताईला पाच महीने पुर्ण झाले आणि त्यांनी ही स्वर्गाची वाट धरली. काकडा भजन आणि हरिपाठ हा नित्य नियम करत नित्य नेम प्राणी दुर्लभ संसारी असा नियम पाळत संसारी वारकरी असे जीवन जगले.त्यांचा बुधवार दि. ७ आॅगस्ट २०२४ रोजी होत असलेल्या दशक्रियेनिमित्त भावपुर्ण श्रद्धांजली.

कवी यशवंत पुलाटे

जेष्ठ साहीत्यिक दुर्गापूर

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!