spot_img
spot_img

अस्मिता पवार,आर्या जगताप यांची अहमदनगर जिल्हा अंडर 19 क्रिकेट संघात निवड…

नेवासा फाटा( प्रतिनिधी) :- महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सोलापूर येथे होणाऱ्या 19 वर्षाखालील ( मुली) निमंत्रित सामन्यांसाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे अस्मिता संभाजी पवार व आर्या राजेश जगताप यांची निवड करण्यात आली. या निवड चाचणीमध्ये नगर जिल्ह्यातील अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदवला .या निवड चाचणीमध्ये अस्मिता व आर्या या दोघींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून जिल्हा अंडर 19 क्रिकेट संघात निवड निश्चित केली.

मागील वर्षी पुणे येथे झालेल्या पंधरा वर्षाखालील अहमदनगर जिल्हा संघामध्ये या दोघींचा सहभाग होता .या दोघींची निवड झाल्याबद्दल नेवासा तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमी ,राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे .अस्मिता पवार ही निंभारी येथील एडव्होकेट संभाजी पवार यांची मुलगी असुन मुळा एज्युकेशन चे ज्ञानदीप इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी आहे. तर आर्या जगताप ही सेंट मेरी स्कूल ची विद्यार्थिनी आहे. दोघींनीही सुदर्शन क्रिकेट अकॅडमी मधून प्रशिक्षण घेतले आहे .अकॅडमी चे संस्थापक व प्रशिक्षक इमरान खान पठाण सर यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!