21.6 C
New York
Wednesday, September 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

बेपत्ता मुलीचा तपासला लागेना; पालकांचा पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):-तालुक्यातील हरेगाव येथील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्याप मुलीला घेऊन फरार आहे. त्याचा तपास लावावा यासाठी मुलीच्या पालकांनी तालुका पोलीस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला.

दि. 26 जून रोजी हरेगाव येथील अल्पवयीन मुलीला पळून नेल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी मुख्य आरोपीला मदत करणारा सचिन आव्हाड राहणार उंदीर गाव यास अटक केली त्याची मोटार सायकल व मोबाईल जप्त केला आहे मात्र यातील मुलगी व मुख्य आरोपी सागर आव्हाड हे अद्याप पोलिसांना सापडत नाही . पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील जेजुरी शिर्डी दौंड या ठिकाणी पथक पाठवून तपास करण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी मिळून आला नाही .काल दि.२ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तालुका पोलीस ठाण्यासमोर डिझेल अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!