श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ) :- तालुक्यातील गोंडेगाव येथे गणपतीच्या मुर्तीसमोर कोणीतरी अज्ञात इसमाने काळ्या रंगाच्या प्लॅस्टीक पिशवीमध्ये मांसाचे तुकडे ठेवून मुर्तीची विटंबना करून धार्मिक भावना दुखविल्याने काहीकाळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेची वेळीच पोलिसांनी लक्ष घातल्याने गावातील वातावरण सध्या शांतता असून सदरची घटना शनिवारी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान घटना घडली.सकाळी गणपतीच्या मदिरात दर्शनासाठी आलेल्या अमोल कदम यांना हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी घटनेची माहिती गावातील प्रमुख नेत्यामंडळीना दिल्याने गावातील नागरिकानी मदिरांकडे धाव घेतली असता घटनेची माहिती सोशल मिडियावर व्हायरल झाल्यामुळे श्रीरामपूरातील हिंदूत्वादी संघटना आक्रमक झाले.
त्यामुळे तालुका पोलीस ठाण्यात कार्यकर्ते जमा झाले.या प्रकरणाचे गांभिर्य ओळखले असता डिवायएसपी डॉ.बसवराज शिवपुंजे, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी फौजफाट्यासह गावात गेले.तोपर्यंत गावातील ग्रामस्थ मंदिरांसमोर दाखल झाले.पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले.या घटनेचे गांभिर्याने पाहून याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.याप्रकरणी अमोल कदम (रा.गोंडेगाव ) तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध रजि नं 439 /2024 बी एन एस कायदा 299 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस तपास करत आहेत.तसेच पशुवैदयकीय अधिकाऱ्याना पाचारण करण्यात आले. तपासणीसाठी मांसे तुकडे नाशिक येथील फॉरेन्सिकची लॅब येथे पाठविण्यात आले. दोन ते तीन दिवसांत अहवाल प्राप्त झाल्यानंतर अधिक माहिती समोर येईल.सांगण्यात आले
घटनेच्या निषेधार्थ
गोंडेगाव बंद
आज (दि. 4.)2024 रोजी शनिवारी घडलेल्या प्रकाराच्या निषेधार्थ गोंडेगाव बंद ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आलेला आहे. भविष्यात अशा विटंबना घटना घडू नये म्हणून गाव बंदची हाक करण्यात आली गावातील सर्व जातीधर्मचे नागरिक गुण्यागोविंदाने (एकोपाने )राहत आहे. यापुढे पण एकत्र राहतील अशी माहिती सरपंच सागर बढे यांनी दिली.
सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी
ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील प्रत्येक चौकात व मदिरांच्या परिसरात चोरीच्या व धार्मिक विटंबना अशा गोष्टी घडून नये यांची खबरदारी म्हणून सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी गावकऱ्यानी केली आहे मात्र या विषयांवर दुर्लक्ष न करता लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी नागरिक करीत आहे.