3.2 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

थोरात कारखाना कार्यस्थळावर आज  ( ५ ऑगस्ट) पासून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सह.साखर कारखाना येथील अमृतेश्वर मंदिर प्रांगणात काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि.5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट 2024 या कालावधीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.

वै.स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य ह.भ.प रामभाऊ महाराज गावडे यांचे प्रेरणेने व ह.भ.प. गुरुवर्य कलामाई यांचे कृपाशिर्वादाने व ह.भ.प.गोविंद महाराज करंजकर तसेच ह.भ.प.चंद्रलेखाताई काकडे यांचे मार्गदर्शनाखाली सलग 39 व्या वर्षी या सप्ताहाचे आयोजन होत आहे.

या सप्ताहाची घटस्थापना सोमवार दि.5 ऑगस्ट रोजी सकाळी ९ वा काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कांचनताई थोरात यांच्या शुभहस्ते होणार आहे. या सप्ताहात सकाळी ५ ते ६ काकड भजन,सकाळी ८ ते ११ ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण, सकाळी ११ ते १२ गाथाभजन,सायं.४ ते ५ सामु.हरिपाठ, सायं.५ ते ६ ज्ञानेश्वरी प्रवचन,सायं ७ ते ९ हरिकिर्तन नंतर हरिजागर होणार आहे.

यामध्ये सोमवार दि.5 रोजी ह.भ.प.वीर भाऊसाहेब पाटोदेकर(प्रवचन ), ह.भ.प. रामकृष्ण महाराज चौधरी (किर्तन ), मंगळवार दि 6 रोजी ह.भ.प. शशिकलाताई सूर्यवंशी (प्रवचन ), ह.भ.प. सुनिल महाराज मंगळापुरकर (किर्तन ), बुधवार दि.7 ह.भ.प. अनिताताई वदक (प्रवचन ), ह.भ.प पांडुरंग महाराज नांदगावकर (किर्तन ), गुरुवार दि.8 ह.भ.प. आशाताई वर्पे (प्रवचन ), ह.भ.प. रामायणा चार्य गोविंद महाराज करंजकर 2 ते 4 व अरुण महाराज फरगडे 7 ते 9 (किर्तन ), शुक्रवार दि.9 ह.भ.प. मिनाताई सुपेकर (प्रवचन ), ह.भ.प. हरिदास महाराज सानप (किर्तन ), शनिवार दि.10 ह.भ.प. चंद्रलेखाताई काकडे (प्रवचन ), ह.भ.प बाळासाहेब महाराज रंजाळे.(किर्तन ), रविवार दि.11ह.भ.प. अलकाताई मोहटे (प्रवचन ), ह.भ.प. राजेंद्र महाराज सदगीर यांचे (किर्तन ) होणार असून सोमवार दि.12 ऑगस्ट 2024 रोजी स.९ ते ११ यावेळी ह.भ.प. प्रकाश महाराज जंजीरे (राशीन.ता. कर्जत) यांचे काल्याचे किर्तन व सोहळ्याची सांगता होणार आहे.

रविवार दि 11 ऑगस्ट 2024 रोजी सायं.६.३० वा कारखान्याचे चेअरमन प्रतापराव ओहोळ व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सविताताई प्रतापराव ओहोळ यांचे हस्ते दिपप्रज्वलन होणार असून यावेळी काँग्रेस विधीमंडळ नेते आमदार बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे,इंद्रजितभाऊ थोरात,डॉ.जयश्रीताई थोरात यांचे सह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे.

तरी या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालकजगन्नाथघुगरकर,कार्याध्यक्ष,सेक्रेटरी,खजिनदार व सांस्कृतिक मंडळाच्या सर्व संचालकांनी केले आहे.

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!