लोणी दि.५( प्रतिनिधी):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या गावोगावच्या शाळा,महाविद्यालय, तांञिक आणि अतांञिक महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली.यावेळी वृक्षारोपणासह त्यांचा विचारांचे प्रबोधन करत विचार जतन करण्याचा संकल्प करण्यात आला.
संस्थेच्या मुख्य कार्यालयात जेष्ठ संचालक ज्ञानदेव म्हस्के,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ,सहसचिव भारत घोगरे,अतांञिक विभागाचे संचालक डाॅ.प्रदिप दिघे,शिक्षण संचालिका सौ.लिलावती सरोदे,शिक्षण सहसंचालक प्रा.नंदकिशोर दळे,डाॅ.आर.जी.रसाळ आदी विभाग प्रमूख यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात लोकनेते खासदार डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यात आले. यावेळी भौतिकशास्त्र विभागातील शिवाजी अनर्थे यांनी बाळासाहेब विखे पाटील यांचा जीवनपट कार्याचा आढावा घेत त्यांनी पाणी परिषदेच्या माध्यमातून व प्रवरा सामाजिक अभ्यास मंडळाच्या माध्यमातून केलेल्या कामांचा आढावा घेतांना बाळासाहेब विखे पाटील यांनी सदैव शेती, शिक्षण, आरोग्य व सहकार यासाठी अविरतपणे कार्य केले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी शेतीची आणि सहकार याच्याशी असलेली आपली नाळ अखंडपणे जोडलेलीच ठेवली. खेड्यात राहून विश्वाचा विचार करणारी त्यांची विचारसरणी आजही ग्रामीण परिवर्तनाची नांदी ठरत आहे.असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे,डाॅ.शांताराम चौधरी आदी उपस्थित होते. संस्थेच्या प्रवरा कन्या विद्या मंदीर,प्रवरा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र,प्रवरा अभियांञिकी,तंञनिकेतन आदी ठिकाणी मान्यवरांनी अभिवादन केले.
शेतकरी आणि गोरगरीब जनतेच्या मुलांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळावे.शहरी भागाचे शिक्षण ग्रामीण भागातदेण्यासाठी आणि मुलीच्या शिक्षणासाठी नेहमी कार्यरत राहून प्रवरा शैक्षणिक संकुलातून आज अनेक विद्यार्थी हे देशात आणि परदेशात कार्यरत आहेत.शिक्षणा सोबत नोकरीची उपलब्धता हा उद्देश पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांचा होता त्यांचे विचार जपत पुढे जाण्याचा संकल्प जयंत्तीनिमित्त करण्यात आला.



