29 C
New York
Sunday, August 17, 2025

Buy now

spot_img
spot_img

आयसीयुतील पेशंटला गळा दाबून मारण्याची धमकी! नगर येथील सुरभी हॉस्पिटलमधील घटना; डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

नगर( जनता आवाज वृत्तसेवा):- शहरातील मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या सुरभी रुग्णालयातील आयसीयुमध्ये उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण वसंत वामन गाडे (रा. चिंचोडी पाटील, ता. नगर, जि. नगर) यांनी डॉक्टरला विचारले लघवी करायची आहे, तेव्हा तेथील कर्मचारी यांनी वसंत गाडे यांना बेडवर ढकलून दिले. त्यामुळे गाडे यांना पलंगाचा गज लागून डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांचे बेडला हात-पाय बांधून तोंडावर, डोळ्यावर मारहाण करण्यात आली व ‘अगर आवाज किया तो मार डालुंगा’ अशी रुग्ण वसंत गाडे यांना धमकी दिली गेली. रात्रीच्या सुमारास रुग्णालयात हा प्रकार घडला.

याप्रकरणी रुग्णाचा मुलगा विजय वसंत गाडे याने तोफखाना पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी डॉ. वैभव अजमेर व सर्जिकल वार्डमधील कर्मचारी, सुरभी हॉस्पिटल यांच्या विरुद्ध भारतीय न्याय सहिंता कलम १०९ , ११५ , १९५ (२), ३५२, ३५ १ (२),(३), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मागदर्शनाखाली पोसई मोरे हे करीत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!