8.6 C
New York
Thursday, November 21, 2024

Buy now

spot_img
spot_img

व्यकतिगत टिका करणाऱ्या बोलघेवड्यांचे लोकांसाठी योगदान काय ?-ना.विखे महायुती सरकारमुळे योजनांचा लाभ! महसूल पंधरवड्यात राहाता येथे शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण

शिर्डी,(जनता आवाज वृत्तसेवा ):-राज्यातील महायुतीचे सरकार लोकाभिमुख काम करत आहे.महाविकास आघाडी सरकार मध्ये फक्त भ्रष्टाचार सुरू होता.जिल्ह्याला तीन मंत्री होते पण जनतेसाठी कोणाचाही उपयोग नाही.एकही योजना जिल्ह्याला आणता आली नाही.आज बोलघेवडे पुढारी येवून करीत असलेल्या टिकेला मी घाबरत नाही.त्यांचे योगदान तरी कायॽतुमच्या आशीर्वादाने या मतदार संघाचा विकास पुढे नेण्याकरीता कटीबध्द राहाण्याची ग्वाही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील 

महसूल पंधरवडा निमित्त राहाता येथे विविध शासकीय योजनांच्या वैयक्तिक लाभांचे महसूलमंत्री श्री.विखे पाटील यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिर्डी प्रांताधिकारी माणिकराव आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने, राहाता तहसीलदार अमोल मोरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब जेजुरकर, मुकुंदराव सदाफळ आदी उपस्थित होते.

याप्रसंगी सामाजिक अर्थसहाय्यातील संजय गांधी निराधार अनुदान,‌ इंदिरा गांधी ,‌ श्रावणबाळ सेवा निवृत्ती वेतन, आदिवासी शासकीय प्रमाणपत्र व शिधापत्रिकेचा प्रत्येकी पाच लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कृषी विभागाच्या ११ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी पोलीस विभागात शासन नियुक्ती मिळालेले स्थानिक युवतींचा व सीए परीक्षा पास झालेल्या युवकाचा महसूलमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महसूलमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले की, एका सप्ताहात योजनेची माहिती नागरिकां पर्यंत पोहचू शकत नाही म्हणून ‘महसूल पंधरवडा’ साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ‘पशुसंवर्धन पंधरवडा’ ही साजरा करण्यात येत आहे. या महसूल पंधरवड्यात महसूली दाखल्यांचे सर्वसमान्यांना प्रभावीपणे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १८९ तलाठ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. अत्यंत पारदर्शक पध्दतीत ही भरती प्रक्रिया पार पडली. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत‌ राहाता तालुक्यात ५४ हजार अर्ज भरण्यात आले. मुख्यमंत्री बळीराजा योजनेत शेतकऱ्यांचे शंभर टक्के वीज बील माफ करण्यात आले. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या उच्च शिक्षणासाठी मुलींना मोफत शिक्षणाचा निर्णय शासनाने घेतला.

राज्यात जनतेच्या मनातील सरकार आहे.महायुती सरकारमुळे योजनांचा लाभ तुमच्यापर्यत पोहचत असल्याने सरकारचा लोकाभिमुख कारभार तुमच्या समोर आहे.यामुळेच महाविकास आघाडीचे नेते अस्वस्थ झाले आहेत.लाडकी बहीण योजनेत ५४हजार महीलांनी अर्ज दाखल केले.उच्च शिक्षण मोफत देवून मुलीना मोठी संधी देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

आज सर्व धरण भरली आहेत.कालव्यात पाणी सोडले आहे.यामधून तळे भरून देण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की यापुर्वी समन्यायी पाणी वाटप कायद्याचा मोठा त्रास झाला.कायदा करण्यास कारणीभूत ठरलले यावर बोलायला तयार नाहीत.यासाठी मोठा संघर्षही झाला न्यायालयीन लढाई केली.आज गावागावात येवून बोलणारे तेव्हा कुठे होतेॽ

शेती महामंडळाच्या जमीनी मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला.औद्योगिक वसाहत होत असल्याने डिफेन्स क्लस्टरचा मोठा प्रकल्प येत असून तालुक्यातील दोन हजार युवकांना रोजगार निर्माण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

तालुक्यातील या मेळाव्यात सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेत ८१३ लाभार्थ्यांना व कृषी विभागाच्या १२०० लाभार्थ्यांना लाभ देण्यात येत आहे. तालुक्यात महात्मा फुले जन आरोग्य योजनेत ७६ कोटी ३३ लाखांचा आरोग्य लाभ वितरित करण्यात आला. १७ हजार २६३ शेतकऱ्यांच्या खात्यात ९ कोटी ४४ लाखांचे दूध अनुदान देण्यात आले‌. ४४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला‌‌. निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे कालव्यातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.असे ही श्री.विखे पाटील यांनी सांगितले.

याप्रसंगी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या कामास जिल्ह्यात सुरूवात आली‌. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज या मेळाव्यात भरण्यात आले. या योजनेची गटविकास अधिकारी श्री.पठारे यांनी‌ माहिती दिली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!