पाथरे (जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते डॉ बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,पाथरे बु ता. राहाता येथे सन २०२४-२५ या वर्षीचा माता पालक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भास्करराव विश्वनाथ पाटील घोलप होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा. उमेश पाटील घोलप उपस्थित होते .
कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांमध्ये घडणारे शारीरिक बदल, मानसिकतेत होणारे बदल, भावनिक बदल, निरोगी आरोग्यासाठी घ्यावयाची काळजी, सोशल मीडिया व त्याचे विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारे परिणाम याविषयी सखोल अशी मार्गदर्शन करत त्यावरील उपाय यावर ही विस्तृत मार्गदर्शन केले. तसेच माता पालकांनी आपल्या पाल्यांकडे वर्तनाकडे सदोदित लक्ष ठेवून असावे व चुका दिसल्यास त्याबावत त्यांच्याशी चर्चा करून त्यांस वेळीच समज देण्याचा सल्ला दिला. पाल्यांना आपण समाजाचा एक भाग आहोत ही जाणीव त्यांना करून देणे गरजेचे असून सुसंस्कारी जीवन जगण्यावर भर देण्याचे शिकवावे असे आव्हान यावेळी केले. तसेच शाळेतील शिक्षणाने मुलांचा बौद्धिक व शारिरीक विकास तर होतोच पण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक विद्यार्थी संवाद खुप महत्वाचा असून त्याबाबत सर्व पालकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे म्हटले. त्यासंदर्भात येणाऱ्या अडचणींबद्दल वेळप्रसंगी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचा सल्ला त्यांनी उपस्थित माता पालक व विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ज्येष्ठ प्रा. नूतन जोंधळे मॅडम यांनी शिक्षणाबरोबरच विद्यार्थी चारित्र्यसंपन्न बनले पाहिजे संस्कार अंगी बाळगून समाजात प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे पाचात्य संस्कृतीला झिडकारून भारतीय संस्कृतीतील चांगल्या गोष्टी अंगीकारल्या पाहिजे असे सांगितले. महाविद्यालयात राबवल्या जात असणाऱ्या विविध शैक्षणिक कार्यक्रमांची माहिती यावेळी त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून दिली. यावेळी पालक प्रतिनिधी म्हणून सौ आशाताई ब्राह्मणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सृष्टी मांढरे, कल्याणी डोखे, लावण्या बनसोडे, विवेक घोडके यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमासाठी मा धोंडीराम पाटील कडू मा किरण पाटील कडू मा मोहम्मदभाई शेख मा खलीलभाई घोणे आदींसह मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. बारगुजे सर उपप्राचार्य मा. वाणी मॅडम यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. पोपट घोलप सर सूत्रसंचालन प्रा. संतोष गुळवे यांनी केले. तर आभार प्राध्यापक सुभाष तांबे यांनी मानले.