राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-कुरियर कंपनीच्या ऑफिसचे शटर उचकटवून ऑफिसमधील कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम 93 हजार 794 रुपये तसेच सीसीटीव्हीचा डी व्ही आर व वाय फाय चे राऊटर असा मिळून सुमारे 1 लाख 294 रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची खळबळ जनक घटना नगर मनमाड महामार्गालगत असलेल्या एका कुरिअर कंपनीचे ऑफिसमध्ये साकुरी हद्दीत घडली याबाबत राहाता पोलिसात अज्ञात चोरट्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नगर मनमाड महामार्ग लगत साकुरी हद्दीत एका कुरिअर कंपनीचे ऑफिस आहे येथील कामगार अर्थात पार्सल डिलिव्हरी चे काम करणारा मनोज छबुराव गाढवे वय 33 वर्ष हा नेहमी प्रमाणे दि 4 ऑगस्ट रोजी सर्व कामकाज आटोपून दि 3 ऑगस्ट रोजी चे 49 हजार 27 रुपये व 4 ऑगस्ट रोजी चे 44 हजार 767 रुपये असे मिळून एकूण 93 हजार 794 रुपये गाढवे व त्याचा सहकारी प्रवीण पुंजाजी बनसोडे यांनी ऑफिसचे लॉकरमध्ये ठेवले होते त्यानंतर ऑफिसचे शटरला कुलूप लावून दोघेही घरी गेले दुसरे दिवशी सोमवार दि 5 ऑगस्ट 24 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मनोज गाढवे नेहमी प्रमाणे ऑफिस उघडण्यासाठी आला असता त्यास ऑफिसचे शटर उचकटवल्याचे दिसून आले त्याने त्याचा सहकारी प्रवीण पुंजाजी बनसोडे यास बोलावून पोलिसांना चोरी झाल्याबाबत माहिती दिली
पोलिस घटनास्थळी आल्यानंतर शटर वर करून आत मध्ये बघितले असता ऑफिस मधील कपाटाचे लॉकरमध्ये ठेवलेली एकूण रोख रक्कम 93 हजार 794 तसेच 5 हजार रुपये किंमतीचा सीसीटीव्ही चा डीव्हीआर व दीड हजार रुपये किमतीचे वायफाय साठी लागणारा राऊटर चोरट्यांनी चोरून नेला आहे ऑफिसचा पार्सल डिलिव्हरी बॉय असणारा कर्मचारी मनोज छबुराव गाढवे वय 38 वर्ष याने दिलेल्या फिर्यादी वरून राहाता पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.