3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

सात्रळ महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या प्राध्यापकास भारत सरकारचे पेटंट

सात्रळ( जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, सात्रळ (ता. राहुरी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक रोहिदास भडकवाड यांना ‘पर्यटन व्यवसायाच्या विकासासाठी आणि प्रचारासाठी सहजपणे हाताळता येणारा प्रसिद्धी स्रोत’ या शोधावर भारत सरकारच्या पेटंट विभागाकडून पेटंट मंजूर झाले आहे.

21 व्या शतकात, पर्यटन हा झपाट्याने विस्तारणारा, कमी-गुंतवणुकीचा, उच्च परतावा देणारा उद्योग म्हणून उदयास आला आहे, जो राष्ट्रांच्या आर्थिक व सांस्कृतिक प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. एखाद्या देशाच्या प्रगतीमध्ये तेथील ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक घटक महत्वाची भूमिका बजावताना दिसून येतात. भारताने, विशेषत: महाराष्ट्राने आर्थिक विकासाला चालना देत पर्यटनाची महत्त्वपूर्ण भूमिका पाहिली आहे. समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि वैविध्यपूर्ण आकर्षणे असलेले महाराष्ट्र हे जागतिक पर्यटन केंद्र म्हणून ओळखले जात आहे जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता ठेवते.

पर्यटन स्थळांची आकर्षणे, सुगमता, सेवासुविधा आणि निवासव्यवस्था या मुख्य घटकांचा अभ्यास करून अहमदनगर व औरंगाबाद आत्ताचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची पर्यटकांसाठी सहजपणे हाताळता येणारा ‘पर्यटन स्थळांचा प्रसिद्धी स्रोत’ यावर प्रा. रोहिदास संपत भडकवाड व त्यांचे संशोधक मार्गदर्शक प्राचार्य डॉ. सुभाष निकम सर यांनी संशोधन केले. या संशोधनासाठी भारत सरकारच्या पेटंट विभागाने वरील पेटंट मंजूर केले आहे. या संशोधनामुळे पर्यटकांना पर्यटन करण्यासाठी आवश्यक सर्व माहिती उपलब्ध होणार असून दुर्लक्षित पर्यटन स्थळांच्या विकासासाठी देखील त्याची मदत होणार आहे.

प्रा. रोहिदास भडकवाड हे सध्या लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाध्ये सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील भूगोल विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रोहिदास भडकवाड यांनी औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यातील तुलनात्मक पर्यटन विकास या विषयावरील पी. एच.डी. प्रबंध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास सदर केलेला असून त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन जर्नल मध्ये शोधनिबध प्रसिद्ध केले आहेत, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे ते जिल्हा समन्वयक असून त्यांना राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी पुरस्कार मिळालेला आहे.

ग्रामीण भागात अध्यापन करत आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून समाजाभिमुख संशोधन कार्य केल्याबद्दल प्रा. रोहिदास संपत भडकवाड यांचे संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव मा. श्री. भारत घोगरे पाटील, शिक्षण संचालक व प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, सर्व सहकारी प्राध्यापक- प्राध्यापकेतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!