spot_img
spot_img

सख्खा भाऊ निघाला पक्का वैरी, शिर्डीतील तरुणीचे हत्येचे रहस्य उलगडले

शिर्डी( प्रतिनिधि):- शिर्डी म्हटले की साईबाबा तीर्थक्षेत्र हे जागतिक दुसऱ्या क्रमांकाचे आहे. शिर्डीमध्ये काल तरुणीचा खून झाला होता.शिर्डीत ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका भावानेच आपल्या बहिणीची डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक घालून निर्घृण हत्या केली आहे. बहिणीचे प्रेमसंबंध असल्याने भावाला राग अनावर झाल्याने भावाने सख्ख्या बहिणीची हत्या केलीय. या घटनेने शिर्डीत खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या महितीनुसार, आपल्या बहिणीचे प्रेमसंबंध समजल्यावर भाऊ आणि तिच्यात बराच वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने निर्दयी भावाने आपल्या सख्ख्या बहिणीच्या डोक्यात थेट सिमेंटचा पेव्हर ब्लॉक टाकला. यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली असून अल्पवयीन आरोपीस येवला आणि शिर्डी पोलिसांनी मध्यरात्री ताब्यात घेतलं. शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ करत आहेत.
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!