राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-हातमाग उद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत.या क्षेत्रातील कारागिरांना कौशल्य मिळाल्यास हातमागच्या पारंपारीक व्यवसायास अधिक पाठबळ मिळेल असे प्रतिपादन जिल्हा परीषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांनी केले.
राष्ट्रीय हातमाग दिवसाचे निमित्ताने हातमाग कामगारांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन भारतीय जनता पक्षाच्या महीला आघाडीच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमात महीला व पुरुष कामगारांचा सत्कार सौ.विखे यांच्या हस्ते करण्यात आला.भाजपा महीला मोर्च्याच्या जिल्हा सरचिटणीस डॉ वैशाली म्हस्के,श्रीरामपूर तालुका अध्यक्षा सौ.मंजूषा ढोकचौळे,उपाध्यक्षा सुवर्णा मोकाशी,नीता कांदळकर,संरपंच संगीता शिंदे,लिलावती सरोदे, माजी सभापती तुकाराम बेंद्रे,बबलू म्हस्के, साहेबराव म्हस्के, अमृत मोकाशी,अजित बेंद्रे, प्रवरा बँकेचे संचालक शंकरराव पाटील बेंद्रे, प्रवरा कारखान्याची माजी संचालक अण्णासाहेब पाटील बेंद्रे, जेष्ठ कार्यकर्ते तानाजी पाटील बेंद्रे आदी उपस्थित होते.
आपल्या भाषणात सौ.विखे पाटील म्हणाल्या की,सात ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात हातमाग दिन म्हणून साजरा केला जातो.परंपरा आणि वारसा जोपासत या व्यवसायातील कारागीर वर्षानुवर्ष काम करीत आहेत.परंतू या पारंपारीक व्यवसायाला अधिक प्रोत्साहन देण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
येवल्याच्या पैठणी उत्पादनाचा उल्लेख करून सौ.विखे म्हणाल्या की,आयोध्येतील राम मंदीराच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमिताने प्रभू श्रीरामांना येवल्यातून पाठविलेला शेला विणण्याची संधी मिळाली.त्याचवेळेस तिथे कारगीर म्हणून काम करणारे आपल्या संस्थेतील विद्यार्थी भेटले तेव्हा त्याचा मला खूप अभिमान वाटला. या विद्यार्थ्याना व्यवसायातील कौशल्या बाबत प्रशिक्षण दिल्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल.
देशाच्या अर्थ व्यवस्थेत हातमाग व्यवसायाने महत्वाची भुमिका बजावली आहे.या व्यवसायाची साखळी निर्माण झाल्यास ग्रामीण भागातील कारागीरांना अधिक मदत होवू होवू शकेल.निर्माण होणार्या उत्पादित मालाला देशांतर्गत बाजारपेठे बरोबरच बाहेरील देशातही संधी निर्माण होतील असे सुचित करून ग्रामीण भागातील या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशिक्षण सुविधा देण्याची ग्वाही त्यांनी दिली.