शिर्डी( जनता आवाज वृत्तसेवा ):-शिर्डी नगर परीषदेच्या माध्यमातून सन २०२४-२५ मध्ये करण्यात येणारे कर मूल्यांकनास तातडीने स्थगिती द्यावी आशी मागणी महसूल तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात मंत्री विखे पाटील यांनी एक सविस्तर पत्र मुख्यमंत्र्यांना दिले असून यामध्ये मूल्याकनांमुळे नागरीकांवर होत असलेल्या अन्यायाकडे लक्ष वेधले आहे.
सध्या नगरपरीषदेवर प्रशासक असल्याने नगरपरीषदेच्या अधिनियमानूसार मुल्यांकनासाठी आवश्यक असलेली आपीलीय समिती अस्तित्वात नसल्याची बाब मंत्री विखे पाटील यांनी पत्राद्वारे निदर्शानास आणून दिली.
मूल्याकनांची प्रक्रीया राबविली गेल्यास नागरीकांना आपील करण्याची संधी मिळू शकणार नाही.सुनावणीचा कालावधी लांबणीवर पडून एकप्रकारे नागरीकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.यापुर्वी सातारा भोर आणि संगमनेर नगरपरिषदेच्या मूल्याकंन प्रक्रीयेस स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने शिर्डी नगर परीषदेच्या मूल्यांकन प्रक्रीयेस स्थिगीती देण्याती विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ना.विखे पाटील यांनी केली आहे.