लोणी दि.३ (प्रतिनिधी):-अंगीभुत असलेल्या गुणवत्तेचा जर सर्वांगीण विकास झाला तर व्यक्तिमत्व विकासासोबत शैक्षणिक सामाजिक प्रगती निश्चित होते गरज असते ती एका मार्गदर्शकाची हेच उद्दिष्ट समोर ठेवत सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालय चिंचोली येथे कौशल्य विकास शिबिरातून विद्यार्थ्याना प्रशिक्षण देण्यात आले.
सी.यु.सक्सीड या संस्थेतर्फे आयोजन करण्यात आलं .त्यामध्ये द्वितीय तृतीय तसेच अंतिम वर्षाच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.बी. शिंदे केले तसेच शिबिराचे महत्व व भविष्यामध्ये त्याची उपयुक्तता याविषयी माहीती दिली. दहा दिवसांच्या शिबिरामध्ये प्रशिक्षक राहुल वाघ तसेच श्रीमती विमला सक्सेना यांनी व्यक्तिमत्व विकास, मुलाखत तंञ,माहिती तंञज्ञान ,वक्तृत्व ,सादरीकरण , संवाद कौशल्य आदी बाबत सखोल मार्गदर्शन केले.
शिक्षणांसोबतचं प्रवरेचा विद्यार्थी हा जागतिक पातळीवर टिकण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखेपाटील,सुष्मिताताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणांसोबतचंविविधचर्चासञे,परिसंवाद,कार्यशाळा प्रक्षेञ भेटीतून सक्षम विद्यार्थी घडविण्याचे काम केले जाते. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी समन्वयक प्रा. ऋषीकेश भालेराव,प्रा.शरद रोकडे,प्रा.दिपक चंद्रे,प्रा. ऋषीकेश भालेराव यांनी प्रयत्न केले.



