श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- स्व.क्रॉमेड माधवराव गायकवाड तसेच स्व.माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांच्या संघर्षाने खंडकरी -आकारपडित शेतकऱ्याना जमिनी देण्याचा निर्णय महायुतीच्या सरकारनेच घेतला.त्यांचे हे फलित असल्याचे महसुल,पशुसंवर्धन,दुग्ध व्यवसाय विकासमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीरामपूर नगरपालिकेच्या केंद्र शासन पुरस्कार अमृत 2.0 अभियानांतर्गत शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या 178.60 कोटीच्या या योजनेतील कामाचा भुमिपुजन समारंभ विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.त्यावेळी व्हिडिओ कॉम -द्वारे जनतेशी संवाद साधला.याप्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील,सदाशिव लोंखडे,माजी आमदार भाऊसाहेब कांबळे,भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठठलराव लंघे, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, नितिन दिनकर, दिपक पटारे, गिरीधर आसने, केतन खोरे, नानासाहेब शिंदे, शरद नवले,अभिषेक खंडागळे बाबासाहेब चिडे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे नेते पूर्ण अपयशी ठरले.श्रीरामपूरकरांसाठी पुढ्च्या वीस वर्षासाठी पाण्याच्या पिण्याची गरज संपली आहेत.युतीचे सरकार प्रामुख्याने कामांना प्राधान्य देत आहेत.मात्र आघाडीच्या सरकारने जनतेचे प्रश्न सोडविले नसल्याचे ना.विखे यांनी उपस्थितांना सागितले.
निळवंडे जिरायती भागाला पाणी मिळून लागले.महायुतीच्या सरकारने केलेले परिश्रम हे आपल्याला न्यात आहे.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अतिशय यशस्वी होत असल्याने १९ ऑगस्ट रक्षाबंधना दिवशी आमच्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दोन महिन्याचे अनुदान दिल्याचे महायुतीच्या सरकार ने ठरविल्याचे ना.विखे यांनी माता भागिनीना सागितले.शेतकऱ्याचे संपूर्ण वीज बिल माफ करण्याचा निर्णय सरकार कडून घेतल्याचे सागितले.महसुल पंधरावाडा व पशूसंवर्धन पंधरावाडा पशुपालकांसाठी अधिकअधिक बाबीची शेतकऱ्याना कशी मदत करता येईल.राज्याची निर्मिती झाल्यापासून महसुल पंधरावाडा पाहिल्यांदा साजरा केलाजात आहेत.जनतेच्या प्रश्नांचे सोडवणूक करण्याचे हेच गरजेचे असल्याचे तेच उद्दिष्ट महायुतीच्या सरकारचे असल्याचे ना. विखे पाटील यांनी उपस्थितांना सागितले.यावेळी बोलताना माजी खासदार म्हणाले की, मी कोणाच्या अधिकारवर गदा आणणारा माणूस नाहीत.त्याशिवाय कार्यक्रमावर अतिक्रमण करणारा माणूस सुद्धा नाही.
ज्यामुळे उपस्थिती असल्यामुळे चर्चा देखील घेईल.मात्र तसेच भाष्य करणाऱ्याना सांगतो की वीस वर्षांत तुमच्याकडून झाले नाहीत.ते काम ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी करून दाखविले.तालुक्यातील अनेक गावाना जमिनी मिळणार आहेत.त्यातील पाच हजार गरीबांना अर्थसहाय्य म्हणून अर्धा गुंठा घरकुलासाठी जागा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे महायुतीच्या सरकारनेच निर्णय घेतला.नगरपालिकेच्या अंतर्गतच्या एकूण साडेतीन हजार गरीबांना अद्यापही घरकुल मिळालेले नाहीत.दुर्देव ते मोठे आहेत.नगरपंचायतीच्या निवडणूका आल्यानंतर घोषणा करायची आश्वासन देयायची कायमची परंपरा आहेत.नगर जिल्ह्यात साडे सात वर्षांत माजी महसुल मंत्र्यांनी पदाचा फक्त उपभोग घेतला.यातील एकाही खंडकऱ्याला त्यांच्याच जमिनी मिळाल्या नाहीत.माजी महसुलमंत्र्यावर माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी टिका केली.गरीबांना जमिनी देण्याचा निर्णय झाला.
नगरपालिकेसाठी 16 कोटी रुपयांची एकूण 26 एकर जामीन मिळाली.ज्याच्यावर नावावर जामीन उपलब्ध नाहीत.त्यांना अर्धा गुंठे जमीन वाटपाचा कार्यक्रम लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीरामपूर येथे होणार असल्याचे माजी खा सदार सुजय विखे पाटिल यांनी सागितले.
त्यामुळे जामीनी मिळाल्यामुळे 206 कोटी रुपये वाचणार आहेत.माजी आमदार भानुदास मुरकुटे तत्कालीन माजी आमदार स्व.जंयत ससाणे यांनी प्रत्येकवेळी प्रयत्न केले.त्यास यश काहीही मिळालेल नाहीत.बऱ्याच वर्षापासून अनुदानापासून लोक वंचित आहेत.नगरपालिकेच्या नवीन इमारतीसाठी आठ एकर शेती महामंडळाची जमीन मोफत दिली जाणार असून नवीन इमारतीसाठी नियोजन असल्याचे असेही श्रीरामपूरकरांना माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी सागितले.