spot_img
spot_img

प्रवरेच्या उन्हाळी शिबीरात राज्यभरातील मुलांचा सहभाग राज्यभरातून विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद

लोणी दि.२ (प्रतिनिधी):- दर्जेदार शिक्षणांसोबतचं मागील बारा वर्षापासून प्रवरेच्या लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या विविध शाखांच्या सहभागातून आणि संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या बाल संस्कार व व्यक्तिमत्व विकास शिबिरास विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद मिळाला.
     

प्रवरा पब्लिक स्कूल येथे आयोजित केलेल्या शिबिरास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यामध्ये पुणे, जालना, बुलढाणा,अहमदनगर इत्यादी ठिकाणांहून विद्यार्थी आले होते.दहा दिवसीय शिबिरात विद्यार्थ्यांना विविध मैदानी खेळ, मनोरंजनात्मक खेळ, कथा सादरीकरण,रायफलशूटींग,धनुर्विद्या,घोडे सवारी, योगा,कराटे,मातीच्या वस्तू बनवणे,संगीत गायन, अग्निविरहित पाककला, गिर्यारोहण,श्लोक पठण, महाराष्ट्रातील गड किल्ल्यांची माहिती तसेच रोबोटिक्स व कोडिंग अशा विविध उपक्रमांचे आयोजन करुन मुलांचे व्यक्तीमत्व घडवीले जात आहे.पहिल्या शिबीराचा समारोप कार्यक्रमात पुणे येथून दाखल झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिबीर आयोजन समितीचे भरभरून कौतुक केले. तसेच अशी शिबिरे भविष्यात देखील व्हावी अशी इच्छा नगर येथून दाखल झालेल्या विद्यार्थ्याच्या आईने व्यक्त केली.समारोप कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध कलाकृतींचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.तसेच विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले. 
या शिबिराच्या नियोजनासाठी संस्थेच्या इंग्रजी विभागाच्या संचालिका सुष्मिताताई विखे पाटील, प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी.बी अंबाडे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले असून समन्वयक म्हणून सौ.शुभांगी रत्नपारखी यांनी अथक परिश्रम घेतले.
 प्रवरा हे शैक्षणिक संकुल हे ग्रामीण भागात असले तरी येथील शिक्षण आणि होणारे उन्हाळी शिबीर हे मुलांसाठी फायदेशीर ठरतात.अल्पवधीत मुलांना खुप काही शिकता आले.पहिल्या बॅचमध्ये माझा मुलगा होता आता दुस-या बॅचमध्ये माझ्या परिसरांतील अनेक मुलांनी प्रवेश घेतला आहे.सर्व सुविधामुळे मुले देखिल येथे येथे रमले आहेत.
     आनंद विनोद धुमाळ पालक पुणे
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!