श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपुरात स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत गुटख्याची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे. त्यांच्याकडून ९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी आरीफ महेबूब शेख, बाबा गफूर तांबोळी, कलीम रहीम शाह असे ताब्यात घेतलल्या आरोपींची नावे आहोत. तर परवेज नवाब शेख हा पळून गेला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काल गुरूवार दि.८ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तालुक्यातील उंबरगाव-मातापूर रोडवर गुप्त माहितीवरून छापा टाकला असता. तेथे राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गुटखा पान मसाल्याच्या गोण्या निघे मारूती इको गाडीतून शेजारी लावलेल्या कारमध्ये टाकत होते. यावेळी पोलिसांनी तेथे छापा टाकत आरीफ शेख, बाबा तांबोळी, कलीम शाह यांना रंगेहाथ पकडले. मात्र, तेथून परवेज शेख हा पळून जाण्यास यशस्वी झाला.
पोलिसांनी आरोपींकडून गोण्यांमध्ये भरलेला केसरयुक्त हिरा मसाल्याचे तसेच रॉयल तंबाखूच्या पुड्यांच्या गोण्यां तसेच मारूती कंपनीची इको (क्र. एमएच ५० ए ०५१५) व पांढऱ्या रंगाची मारूती स्वीफ्ट कार (क्र. एमएच २० इसी ४१९४) सह ३ मोबाईल असा एकूण ९ लाख १६ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पकडलेल्या आरोपींनी सदरचा माल राहाता तालुक्यातील वाकडी येथील सद्दाम शेख तसेच बीड जिल्हयातील मोमीनपुरा येथील इकबाल शेख यांच्याकडून आणल्याचे सांगितले.
याप्रकरणी आरीफ शेख (वय ३१), रा. येलमवाडी, जळगाव, ता. राहाता, बाबा तांबोळी, (वय ४४), रा. अशोकनगर, ता. श्रीरामपूर, कलीम शाह, (वय ३३), रा. पूनमनगर, शिर्डी, ता. राहाता तसेच फरार असलेले परवेज शेख, रा. श्रीरामपूर, सद्दाम शेख, रा. वाकडी, ता. राहाता, इकबाल शेख, रा. मोमीनपुरा, जि. बीड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, डिवायएसपी डॉ. बसवराज शिवपुंजे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर यांच्या पथकातील पोकॉ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. गणेश भिंगारदे, पोकॉ. अमोल कोतकर, पोकॉ. मयुर गायकवाड, पोकॉ. अरूण मोरे यांनी केली आहे.