-0.1 C
New York
Wednesday, December 4, 2024

Buy now

spot_img
spot_img

आदिवासी समाज बांधवांचा उन्नतीसाठी नेहमीच तन- मन- धनाने बरोबर –  गडाख

पानेगांव ( जनता आवाज वृत्तसेवा):- आदिवासी समाज बांधवांचा उन्नतीसाठी नेहमीच तन- मन -धनाने बरोबर असल्याचं जिल्हा परिषद माजी सभापती  सुनिल गडाख पाटील हे अंमळनेर (ता. नेवासे) येथे एकलव्य जयंतीच्या निमित्ताने गडाख आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतं होते.

गडाख यांनी म्हटले की, आदिवासी समाज हा कष्टकरी प्रामाणिक काम करणारा समाज म्हणून ओळख असून देवदूतांचा काळात हि नोंद तर आहेच छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप यांचा काळात हि आदिवासी समाज बांधव योद्धा भूमिकेत उभा ठाकला होता. इंग्रजांना सळो कि पळो करुन सोडले होते. असा हा कष्टकरी समाजासाठी नेहमीच गडाख कुटुंब पाठीशी राहणार असून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार शंकरराव गडाख पाटील नेहमीच अग्रभागी असतात वयक्तिक लाभाबरोबरचं शासन स्तरावरून मिळणारे दाखले, आदिवासी वसाहत असणारे प्रश्न तातडीने मार्गी लागत असल्याचे गडाख यांनी सांगून आदिवासी वसाहत येथे येथून पुढे एकलव्य नगर तालुकाभरात नामकरण करण्यात येणार असल्याचं सांगितलं. कार्यक्रमात लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांची जयंती हि साजरी करण्यात आली.

यावेळी मुळाचे संचालक संजय पाटील जंगले, लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर, गंगाधर पवार,शिरेगांवचे माजी सरपंच रत्नाकर बोर्डे, मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी

माजी सरपंच अण्णासाहेब घावटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अण्णासाहेब माकोणे, लक्ष्मणराव माकोणे, तानाजी घावटे , लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर, राहुल पवार, मच्छिंद्र आयनर, पत्रकार संघटनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील,संजय माकोणे, आशुतोष माकोणे, हरिभाऊ पवार,गंगाधर पवार, संजय रोकडे ,अविनाश रोकडे ,आनंद बर्डे, विशाल बर्डे ,सोमनाथ बर्डे, शेखर बर्डे ,सागर बर्डे, विशाल मोरे ,अविनाश मोरे, भाऊराव बर्डे ,सागर गायकवाड, दीपक पवार ,कांतीलाल पवार, सचिन कनगरे, भोला कनगरे, भागवत बर्डे, राजेंद्र अहिरे, कुंदन अहिरे, तेजस गायकवाड, शक्ती गायकवाड, नवनाथ माळी,सागर सुरसे,लहानू सुरसे,आदींसह घोगरगाव पाचेगाव करजगाव,पानेगांव शिरेगांव येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुत्रसंचलन रामेश्वर घावटे यांनी केले. प्रस्ताविक संजय पवार, आभार विलास बर्डे यांनी मानले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!