3 C
New York
Tuesday, December 3, 2024

Buy now

spot_img
spot_img

आवडत्या करिअरसाठी इच्छेला चांगल्या मेहनतीची जोड द्या– डॉ उज्वल कुमार चव्हाण संग्राम पतसंस्था व जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न

संगमनेर ( जनता आवाज वृत्तसेवा):–जीवनात चांगले होण्यासाठी प्रथम चांगल्या करिअरची मनात इच्छा निर्माण करा .त्या इच्छेसाठी योग्य संधी पाहून जाणीवपूर्वक मेहनत केल्यास आपल्याला आवडत्या क्षेत्रात करिअरची मोठी संधी निर्माण मिळते असे प्रतिपादन ईडीचे माजी उपसंचालक डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी केले आहे.

संग्राम नागरी सहकारी पतसंस्था व जयहिंद लोकचळवळ यांच्यावतीने मालपाणी लॉन्स येथे आयोजित करिअर मार्गदर्शन व गुणवंत गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मा. आमदार डॉ सुधीर तांबे होते . तर व्यासपीठावर आमदार सत्यजित तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, पतसंस्थेचे चेअरमन राणीप्रसाद मुंदडा, व्हा. चेअरमन विजय गिरी, संचालक डॉ सुचित गांधी, डॉ माणिकराव शेवाळे, विलास दिघे, दत्तात्रय आरोटे, सोमेश्वर दिवटे,ॲड प्रशांत गुंजाळ,उमेश बोटकर ,अनिल सातपुते, अमित कलंत्री, सौ सुनंदाताई दिघे, नानासाहेब वर्पे, व्यवस्थापक उमेश शिंदे, डॉ नामदेव गुंजाळ आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते

यावेळी डॉ उज्वल कुमार चव्हाण म्हणाले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करणे ही परंपरा संग्राम पतसंस्थेने अत्यंत दिशादर्शक केली आहे यामधून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. स्पर्धा परीक्षांमुळे ग्रामीण भागातील व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत मोठी संधी मिळत आहे करियर निर्माण करण्यासाठी तुमची मनात इच्छा निर्माण व्हावी लागते त्यानंतर त्या इच्छेला योग्य संधी मिळाल्यावर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर तुमच्या आवडत्या क्षेत्रात करिअरची संधी निर्माण होते

नेहमी चांगली संगत करा. चांगल्या संख्येने समाधान मिळते तर मुर्खांच्या संगतीने दुःख मिळते. वयाच्या वेगळ्या टप्प्यावर योग्य निर्णय घेता आला पाहिजे.

चांगल्या व्यक्ती समाजाच्या आदर्श असल्यास चांगला समाज निर्माण होतो मात्र युवा पिढी पुढे आदर्श कुणाला मानावे अशी समस्या निर्माण झाली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली

मा.आ डॉ तांबे म्हणाले की, विद्यार्थ्यांची मने प्रज्वलित करण्यासाठी या गौरव सोहळ्याचे आयोजन होत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये सात प्रकारचे बुद्धी कौशल्य असून तुम्ही तुमच्यातील कौशल्य ओळखून त्या मार्गाने जाण्याचे धाडस करा. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात बाप ठरावे अशी मेहनत करा. समाजातील विविध आदर्श व्यक्ती डोळ्यापुढे ठेवून अभ्यास केल्यास आपणही त्यांच्याप्रमाणे यश मिळू शकतो असा सल्ला त्यांनी दिली

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, प्रत्येकाला करिअरच्या संधी निर्माण कराव्या लागतात जो स्वतः संधी निर्माण करतो तो यशस्वी होतो जगामधील पहिल्या 10 श्रीमंतांमध्ये नऊ जणांनी स्वतः त्यांची करियर निर्माण केले आहे हा आदर्श घ्या

तर डॉ जयश्री ताई थोरात म्हणाल्या की प्रत्येक विद्यार्थ्यांनी 3डी चा वापर केला. पाहिजे ड्रीम, डिझायर आणि डेडिकेशन यातून तुम्हाला नक्की यश मिळेल.

यावेळी नितीन अभंग, सुभाष सांगळे ,सुरेश झावरे,अशोक हजारे, के जी. खेमनर,जीवन पांचारिया, सुहास आहेर, कैलास सोमानी, के.के. थोरात आदि सह विविध मान्यवर होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेअरमन राणी प्रसाद मुंदडा यांनी केले सूत्रसंचालन दत्तात्रय आरोटे व नामदेव कहांडळ यांनी केले.तर आभार व्हा. चेअरमन विजय गिरी यांनी मानले.

गुणवंतांचा सत्कार

यावेळी विविध 21 विद्यालयांमधील 77 गुणवंत विद्यार्थ्यांसह विशेष प्राविण्य मिळवलेल्या जय मनीष मालपानी आर्यन मॅन, रिया भागवत कानवडे , छोटी जादूगार सायली कुलकर्णी आणि निशांत मिलिंद देशमुख यांचा सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक, शाल, बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला..

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!