श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा):- सर्वसामान्यांना लोकप्रतिनिधी आपल्या सुख – दुःखात आला की हेवा वाटतो आणि लोक प्रतिनिधींना जनतेच्या अडीअडचणी लक्षात येतात आणि त्यावर उपाय योजना देखील करता येते. परंतु विधानसभेच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी दहावे मयती लग्न हे फालतु काम मानल्याने जनतेसोबत भावनिक स्नेहसंबध न राहील्याने आणि मला शिकवतोस का या प्रवृत्तीमुळे त्यांच्याकडे येणाऱ्या तक्रारी देखील कमी झाल्या, एकुणच त्यांचा जनसपंर्क शून्य झाला आहे . असे परखड मत शेतकरी युवक संवाद यात्रेदरम्यान शेतकरी, युवक आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना हेमंत ओगले यांनी मांडले.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या नेतृत्वाखाली तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब दिघे, मार्केट कमिटीचे सभापती सुधीर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली.
यात्रेच्या नवव्या दिवशी हेमंत ओगले यांनी दुपारच्या सत्रात श्रीरामपूर तालुक्यातील रामपूर, कोल्हार, चिंचोली येथील तर दहाव्या दिवशी श्रीरामपूर विधानसभेच्या राहूरी तालुक्यातील बत्तीस गावात सुरुवात करताना गंगापूर – माळेवाडी, पिंपळगाव फुणगी, संक्रापूर येथील ग्रामस्थांसमवेत त्यांनी संवाद साधला.
येथे कॉर्नर सभेत मनोगत व्यक्त करताना हेमंत ओगले म्हणाले की, लोकप्रतिनिधी स्वतःला अधिकारी समजून वागू लागल्याने सर्वसामान्य नागरीकांनी देखील त्यांच्या अरेरावीला वैतागल्याने स्वतःच मार्ग काढत अडचणी सोडवल्या.
दरम्यान जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, स्व. जयंतराव ससाणे यांच्यानंतर थांबलेल्या विकास रथाला गती देण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशिर्वादाची गरज आहे. आपल्या आशिर्वादाचा जोगवा मागण्यासाठी आम्ही हि शेतकरी युवक संवाद यात्रा घेऊन आलो आहोत.
बाबासाहेब दिघे म्हणाले की, भविष्यात विकासकामांना वेग देण्यासाठी हेमंत ओगले हेच योग्य असुन श्रीरामपूर विधानसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने तसेच येथील मतदारांना हेमंत ओगले यांच्या रूपाने चांगला पर्याय मिळाला आहे.
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले आपल्या भाषणात म्हणाले की, जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षा दिपाली ससाणे यांच्या प्रयत्नातून आत्तापर्यंत तिनशेपेक्षा जास्त महीला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्याने अनेक कुटुंबांना स्वयंरोजगार मिळाला आहे. शेतकऱ्यांनी कुसुम सौर योजनेसाठी अर्ज करावेत त्यासंदर्भातील कागदपत्रे दिल्यास करण ससाणे, हेमंत ओगले यांच्या माध्यमातुन पाठपुरावा करू.
यावेळी स्व. जयंतराव ससाणे यांच्यावर प्रेम करणारे मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.