4.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

आशुतोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच – उपमुख्यमंत्री अजित पवार आ.आशुतोष काळेंच्या मागण्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा हिरवा कंदील आशुतोषला ३००० कोटीचा निधी दिला मताधिक्य वाढवा

कोळपेवाडी ( जनता आवाज वृत्तसेवा)  :- अख्या महाराष्ट्राला माहित आहे,अजित पवार सकाळी लवकर उठून सहालाच कामाला सुरुवात करतो, त्यासाठी मला लवकर उठावे लागते मात्र आशुतोष हा मला मतदार संघाची कामे घेवून झोपेतून उठवायला येतो यावरून तुम्हीच सांगा, आशुतोष मला किती वाजता उठवायला येत असेल? असा प्रश्न उपस्थित जनसमुदायाला विचारून आ. आशुतोष काळे यांची मतदार संघाच्या विकासाची तळमळ खूप मोठी असून आशुतोष पठ्या कामाला माझ्यासारखाच असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी कोपरगाव येथे जाहीर कार्यक्रमात सांगितले.

कोपरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत महिला मेळाव्यात महिला भगिनींशी संवाद साधला याप्रसंगी ते बोलत होते. तत्पूर्वी कोपरगावला महिला मेळाव्यास जाण्यापूर्वी कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर शंकरराव काळे यांच्या स्मारकास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी पुढे बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, दहा वेळेस मला ह्या प्रगत राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मिळाली त्यावेळी महिला, युवक, युवती, शेतकरी वर्गासाठी अनेक नवीन नवीन योजना आणण्याचा प्रयत्न केला. जनतेची सेवा करणं आमचा धर्म आहे. आम्ही जनसेवक आणि तुमचे सेवक म्हणून जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जनतेचा सन्मान करायचा आहे. महिला स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना, आपल्या कारभाऱ्याला अधिकचा देण्याचा प्रयत्न करते स्वतःच्या इच्छा,आशा, आकांक्षा यांना मुरड घालते अशा महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजना मागील महिन्यात आणली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर दोन दिवस महिलांच्या खात्यावर हि रक्कम जमा होणार आहे. वर्षाला कोट्यावधी रुपयांची रक्कम महिलांच्या खात्यावर जमा होवून ती रक्कम कोपरगावच्याच बाजारपेठेत खर्च होवून बाजार पेठ फुलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रास्तविक करतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, लाडक्या बहिणींप्रमाणे मी देखील दादांचा लाडका मुलगा आहे. मतदार संघात झालेला विकास हा फक्त आणि फक्त अजितदादा यांनी भरघोस निधी दिल्यामुळेच शक्य झाला आहे. मी ज्या ज्या वेळी अजितदादांकडे मतदार संघाच्या विकासाचे प्रश्न घेवून गेलो व त्यांच्याकडे निधीची मागणी केली त्यावेळी एकदाही रिकाम्या हाताने परत आलो नाही. त्यामुळेच कोपरगावच्या मतदार संघाच्या विकासनिधीचा आकडा ३००० कोटीवर गेला आहे.

ज्याप्रमाणे जनतेच्या बारीक सारीक प्रश्नाची आदरणीय अजितदादांना जाण आहे त्याप्रमाणे राज्यातील प्रत्येक भागाच्या समस्या आणि त्याचे उत्तर देखील दादांकडे आहे. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्री व अर्थ खाते, गृह खाते, उर्जा, कृषी, जलसंपदा, ग्राम विकास अशा विविध विभागाचे मंत्री व विरोधी पक्ष नेते म्हणून देखील त्यांची कामगिरी राज्याला प्रगतीच्या दिशेने घेवून जाणारी ठरली आहे. त्यामुळे आता अजितदादा या राज्याचे मुख्यमंत्री होणे गरजेचे आहे. त्यामुळे आपले पण मोठे प्रश्न (पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविणे) सोडविण्यासाठी मोठी मदत होईल आणि ते मला देखील न्याय देतील याचा मला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

आशुतोष मला त्या दिवशी पहाटे उठवायला आला त्यावेळी मला जाणवलं की कामाच्या बाबतीमध्ये आशुतोष पट्ट्या माझ्यासारखाच आहे त्यामुळे त्याच्या मंजूर बंधारा दुरुस्तीच्या कामासाठी ४१ कोटी रुपये त्या दिवशी सर्वात अगोदर त्याला देऊन टाकले. माझी दुसरी मिटिंग सुरु असली की, हळूच दार उघडतो आणि माझ्याकडे अचानक कोपरगाव मतदार संघाचे प्रश्न आणि अडचणीच पत्र माझ्या हातात देतो. मी देखील त्यावेळेस त्याचा बालहट्ट समजून आशुतोषला नाही म्हणत नाही. आपल्याच घरातला मुलगा अशोकरावंचा मुलगा म्हणजे माझा मुलगा असल्यासारखा आहे. त्यामुळे आशुतोषला नेहमी मदत करत असतो.

आ.आशुतोष काळे यांनी आपल्या भाषणात भावनिक साद घालतांना कोपरगाव मतदार संघात राजपूत (कऱ्हेकर) समाजाचे दैवत वीर महाराणा प्रताप तसेच आदिवासी बांधवांचे दैवत आद्यपुरुष एकलव्य यांचे स्मारक उभारण्यासाठी व क्रीडा संकुलासाठी निधीची मागणी केली. त्याचा धागा पकडत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आशुतोषने केलेल्या मागण्या आशुतोषच्या नाहीत त्या कोपरगावकरांच्या मागण्या असून मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने त्याला शब्द देतो की, त्याच्या मागण्या पूर्ण करण्याची जबाबदारी अजित पवारची राहील अशा शब्दात आ.आशुतोष काळेंच्या मागण्यांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हिरवा कंदील दिला.

भोजडेचे युवा उपसरपंच सलीम शेख यांनी मागील दोन महिन्यापासून आ. आशुतोष काळे पुन्हा आमदार होईपर्यंत चप्पल न घालण्याचा निश्चय केला. त्या युवा कार्यकर्त्याचा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुस्लीम समाज आ. आशुतोष काळे यांच्यावर करीत असलेले प्रेम पाहून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी यावेळी कौतुक केले.

तीन हजार रुपये १७ तारखेला जमा होतील मी तुम्हाला शब्द देतो. मी कोपरगाव मध्ये आलोय पण तीन दिवसांपूर्वी दौरा सुरू करायच्या आधी माय माऊलींना, बहिणींना सबलीकरणा सहा हजार कोटीच्या फाईलवर सही केली आणि मग मी तुम्हाला भेटायला आलो.मी खाली हाताने आलेलो नाही मला खाली हाताने जायची माझी सवय देखील नाही-उपमुख्यमंत्री पवार

या जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे, मंत्री ना. अनिल पाटील, माजी आमदार अशोकराव काळे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष कपिलजी पवार, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका सौ. चैतालीताई काळे आदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी जिल्हा परिषद – पंचायत समिती सदस्य, माजी नगरसेवक, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!