30.6 C
New York
Wednesday, June 25, 2025

Buy now

spot_img
spot_img

लोहारे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण मृत

संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील लोहारे येथे पवार वस्ती जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरिण ठार झाले.पाणी आणि चाऱ्याच्या शोधात असताना लोणी तळेगाव रस्ता ओलांडत असताना लोहारे येथे दुपारी दिड च्या सुमारास पवार वस्ती जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत एक हरिण ठार झाले. शेजारीच राहत असलेले किरण पवार यांनी वन्यजीव प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.

माहिती मिळताच प्राणीमित्र म्हस्के यांनी उपवनसंरक्षक अधिकारी सुवर्णा माने संगमनेरचे सहाय्यक उपवनसंरक्षक अधिकारी संदीप पाटील, गणेश मिसाळ वनपरिक्षेत्र अधिकारी सागर केदार, वनपाल राजेन्द्र अल्हाट,सोनवणे, यांना माहिती दिली. माहिती मिळताच वनमजूर किसन काळे लगेच घटनास्थळी पोहोचले व वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मृत हरणाला वनविभागाच्या साधनाने संगमनेर येथील रोपवाटिकेत पुढील कार्यवाहीसाठी नेण्यात आले.

या वेळी किरण पवार, रविंद्र पवार, नवनाथ कदम, प्रमोद पवार. यांनी मृत हरणाला रस्त्याच्या कडेला घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!