3.9 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

मिसळ, ताक आणि जिलेबी समवेत मंत्री विखेनी कार्यकर्त्याना दिला राजकीय कानमंत्र!

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तालुक्यावर चांगलेच लक्ष कैंद्रीत केले असून आता कार्यकर्ते आणि नागरीकां समवेत मिसळ पे चर्चा करीत त्यांनी शहरामध्ये सकाळीच येवून साधलेल्या संवादाची खमंग चर्चा सुरू झाली आहे.

मागील आठड्यात मंत्री विखे पाटील यांनी सलग तीनवेळा तालुक्याचा दौरा करून तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्याना सक्रीय होण्याच संदेश देतानाच विखे कुटुबियांशी अनेक वर्षे जोडल्या गेलेल्या जुन्या जाणत्या जेष्ठ आणि तरुण कार्यकर्त्यांच्या भेटी घेवून संवादाच्या प्रक्रियेला अधिकच वेग दिला आहे.

या संवादाचा एक भाग म्हणूनच मंत्री विखे पाटील नविन नगर मार्गावरील एका हॉटेलात येवून मिसळी खाण्याचा आनंद घेतला.निळवंडे येथे जलपूजन आणि पाणी सोडण्याच्या कार्यक्रमाला जाताना संगमनेर तालुक्यातील कार्यकर्ते याच हॉटेल मध्ये एकत्रितपणे मिसळ खाण्यासाठी थांबले असल्याचे मंत्री विखे पाटील यांना समजले.कार्यकर्त्यानी त्यांना मिसळ खाण्यासाठी येण्याचा आग्रह केला.

संगमनेर तालुक्यात येताच मंत्री विखे पाटील आपला वाहनांचा संपूर्ण ताफा त्यांनी या हाॅटेलकडे वळवला आणि कार्यकर्त्या समवेत त्यांनी मिसळ खाण्याचा आनंद घेत त्यांनी तालुक्यातील राजकारणा बाबत काही टिप्सही दिल्या.संगमनेची प्रसिध्द असलेली जोशींची जिलेबी त्यांनी आवर्जून मागून घेतली.जोशीच्या जिलेबी स्व.बाळासाहेब विखे पाटील यांची आवड होती आशी आठवण करून देत दिल्ली मधील अनेक नेत्यांना जिलेबी आवर्जून खाऊ घातल्याची आठवण आवर्जून सांगितली.

मिसळ ताक आणि जिलेबी असा आस्वाद घेत मंत्री विखे पाटील यांनी साधलेल्या संवादाची खमंग चर्चा आता राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.

मागील काही दिवसात सलग तीनवेळा मंत्री विखे पाटील यांनी तालुक्यात झंझावती दौरा केला.माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनीही गुंजाळवाडी येथे येवून विधानसभा निवडणुक लढविण्या बाबत सुतोवाच डॉ सुजय विखे यांनी संगमनेर मधून निवडणूक लढविण्या संदर्भात व्यक्त केलेल्या भावनांचा निश्चित विचार करून याबाबत महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करण्याबाबत मंत्री विखे पाटील यांनी केलेली पुष्टी सुध्दा महत्वपूर्ण होती.

तालुक्यातील विकास कामांच्या उद्घटनाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी तालुक्यातील काही गावात तसेच शहरात लावलेली हजेरी आणि कार्यक्रमांना मिळालेला प्रतिसाद लक्षवेधी ठरल्याने विखे पाटील कुटूबियांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात वाढवलेला संपर्क चांगलाच चर्चेचा विषय ठरला असताना आता त्यांच्या मिसळ पे चर्चेचा प्रयोग राजकीय दृष्ट्या लक्षवेधी ठरला आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!