बाजार समिती निवडणूकीची मतमोजणी काल रविवार रोजी श्रीरामपूर शहरातील दादा वामनराव जोशी नवीन मराठी शाळेत पार पडली.सुरवातीच्या पाहिल्या फेरीच्या मतमोजणीपासूनच विखे-ससाणे-मुरकुटे युतीचे सर्व उमेदवार सुमारे १५० ते २१० मतांनी आघाडीवर होते.शेवटपर्यंत ही आघाडी टिकून होती.मतदानात क्रॉस व्होटिंग मोठ्या प्रमाणावर झाले.
विजयी उमेदवारांची नावे घोषित होताच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष करून गुलालाची मुक्त उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली.
उमेदवार व त्यांना पडलेली मते पुढीलप्रमाणे:-
सोसायटी मतदारसंघ सर्वसाधारण जागा-
किशोर बनसोडे, ४९८
सोन्याबापू शिंदे (मुरकुटे) ५०२-विजयी
सचिन गुजर ५३१
सुधीर नवले ५३८
खंडेराव सदाफळ (ससाणे) ५१८ -विजयी
नानासाहेब पवार ५१७
गिरीधर आसने (विखे) ४५५-विजयी
ॲड.अजित काळे, ३८३
अशोक भोसले, २८४
कैलास बोर्डे, २९९
सचिन जगताप, ३६०
नामदेव आदिक, ३१७
युवराज जगताप, २७७
अनिल औताडे, २७१
——–
महिला राखीवमधून
विद्या दाभाडे (ससाणे), ५१२ -विजयी
सरला बडाख (विखे), ५७३-विजयी
मनिषा वमने, २७४
शितल कवडे, ३५४
———-
इतर मागास प्रवर्गातून
राजेंद्र पाऊलबुद्धे (ससाणे), ४९७ -विजयी
किशोर बकाल, ३६०
नितीन पटारे ८
———-
भटक्या जाती-जमाती प्रवर्गातून
दशरथ पिसे (मुरकुटे), ५८२ -विजयी
साहेबराव हळनोर, २८०
ग्रामपंचायत मतदारसंघातून सर्वसाधारण
मयूर पटारे (मुरकुटे), २५८ -विजयी
सुनील (नाना) शिंदे (विखे), २५७-विजयी
रावसाहेब पवार, १३५
संदीप चोरगे, १९७
———–
अनु.जाती जमातीमधून
राजू चक्रनारायण (ससाणे), २७७-विजयी
प्रभाकर कांबळे,१४६
————
आर्थिक दुर्बल घटकातून
अभिषेक खंडागळे (विखे), २६४ -विजयी
ज्ञानेश्वर वडितके, १६१
———–
व्यापारी मतदार संघातून
रोहित कोठारी (ससाणे), ११०
जितेंद्र गदिया (विखे), १७८ -विजयी
अजय डाकले, ५९
शोभा विलास शेटे, ४३
किशोर कालंगडे २२४- विजयी
———-
हमाल मापाडीमधून
दीपक हिवराळे ७० -विजयी
नवनाथ सलालकर १
पारुबाई रोकडे ६१
दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती साठी एकूण १९०९ मतदारांपैकी १८७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूकित ९८.६९ टक्के इतके मतदान झाले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी मतदारसंघात-४०१ पैकी ३८०, हमाल मापाडी मतदारसंघात -१९८ पैकी १९८, सोसायटी मतदारसंघात- ८७९ पैकी ८७१, ग्रामपंचायत मतदारसंघात ४३४ पैकी ४३१ असे एकूण १९०९ मतदारांपैकी १८७९ मतदारांनी आपला मतदानचा हक्क बजावला आहे.