श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- हिंद सेवा मंडळाच्या क .जे . सोमैया हायस्कूल मध्ये ९ ऑगस्ट क्रांतीदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा . सभापती पंचायत समिती श्रीरामपूर च्या प्रा . डॉ. वंदनाताई मुरकुटे, विद्यालयाच्या माजी शिक्षिका श्रीमती शशी लोळगे, विद्यालयाचे चेअरमन संजय छल्लारे, सेवक प्रतिनिधी कल्याण लकडे, मुख्याध्याक भुषण गोपाळे, पर्यवेक्षक चंद्रशेखर वाघ आदि मान्यवर उपस्थित होते .प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भारत माता, क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी क्रांतिवीरांच्या वेशभुषा करून सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरु, सुखदेव,यांच्या कार्याची माहिती आपल्या भाषणात व्यक्त करत होते . देशभक्तीची, स्फूर्ती गीते विद्यार्थ्यांनी सादर केली .
या प्रसंगी विद्यालयाचे चेअरमन छल्लारेे यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा वंदनाताई मुरकुटे यांनी ९ ऑगस्ट क्रांतीदिन हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी हा क्रांतीदिन साजरा केला जातो .या दिवशी भारतीयांनी इंग्रजांच्या अत्याचाराविरुद्ध बंड पुकारले व स्वतंत्र्या च्या दिशेने निर्णायक पाऊल टाकले . व क्रांतीदिनाचे महत्व विशद केले . प्रास्ताविक अनिल चोभे यांनी केले . सुत्रसंचालन स्मिता पुजारी यांनी केले आभार उर्मिला कसार यांनी मानले.